

पुढारी ऑनलाईन डेस्क : इन्स्टाग्राम हा सोशल प्लॅटफॉर्मवर तुम्ही आहात का? तर ही बातमी तुमच्यासाठी. इन्स्टाग्रामने आपल्या युजर्ससाठी एक महत्त्वपूर्ण बदल केला आहे. आता युजर्सना आपल्या इन्स्टाग्राम बायोमध्ये एका पेक्षा अधिक लिंक्स देता येणार आहेत. एका पेक्षा अधिक म्हणजे एकुण पाच लिंक्स देता येणार आहेत. ही नवीन अपडेट इन्स्टाग्राम युजर्ससाठी महत्त्वपूर्ण आणि आनंदाची आहे. ही माहिती मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी दिली आहे. वाचा सविस्तर माहिती. (Instagram bio link )
आपल्यापैकी बरेचजण इन्स्टाग्राम (Instagram bio link) हा सोशल प्लॅटफॉर्मवर आहेत. फोटो, व्हिडिओ शेअर करण्याचं एक सोशल मीडिया साईट म्हणून याकडे पाहिलं जात. बरेचजण या इन्स्टाग्रामचा वापर करुन व्यक्त होत असतो. इन्स्टाग्रामही आपल्या युजर्ससाठी नवनवीन फिचर आणत इन्स्टाग्राम वापरण्यात सुलभता आणि हटकेपणा आणण्याचा प्रयत्न करत आहे. मंगळवारी (दि.१८), मेटा सीईओ मार्क झुकेरबर्गने त्याच्या इन्स्टाग्राम चॅनेलवर एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. या घोषणेत म्हटलं आहे की, इन्स्टाग्राम बायोमध्ये आता पाच लिंक्स समाविष्ट होऊ शकतात. याआधी बायोमध्ये केवळ दोन लिंक्स देता येत होत्या. आता पाच लिंक्स देता येणार आहेत.
तुम्हाला तुमच्या इन्स्टाग्राममध्ये बायोमध्ये लिंक द्यायची आहे का? तर पुढील गोष्टी करा,
हेही वाचा