Instagram Down : व्हॉट्सअॅप नंतर इन्स्टाग्राम डाऊन! यूजर्सकडून अकाऊंट बंद होत असल्याची तक्रार | पुढारी

Instagram Down : व्हॉट्सअॅप नंतर इन्स्टाग्राम डाऊन! यूजर्सकडून अकाऊंट बंद होत असल्याची तक्रार

पुढारी ऑनलाईन डेस्क : व्हाट्सअॅपनंतर आता इन्स्टाग्राम अॅप ठप्प झाल्याची बातमी समोर आली आहे. सोमवारी (दि.३१) अनेक वापरकर्त्यांचे इन्स्टाग्राम अकाऊंट बंद करण्यात आले आहेत. हजारो वापरकर्त्यांना फोटो शेअरिंग अॅप्लिकेशनपर्यंत पोहचण्यासाठी अडचणी येत होत्या, ते पूर्ववत करण्यासाठी काम सुरू असल्याची माहिती इन्स्टाग्रामने दिली आहे. (Instagram Down)

काही प्रकरणांमध्ये आउटेजमुळे वापरकर्त्यांचे इन्स्टाग्राम अकाऊंट बंद करण्यात आले आहेत. तर अकाऊंट पुन्हा एकदा सुरू करण्यासाठी ई-मेल आणि मोबाईल नंबरची मागणी इन्स्टाग्रामकडून करण्यात येत असल्याचे वापरकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, इन्स्टाग्राम डाऊन झाल्याने अनेक वापरकर्त्यांचा हिरमोड झाला आहे. (Instagram Down)

याबाबत इन्स्टाग्रामने ट्वीट केले आहे की, आम्हाला माहिती आहे की, तुमच्यापैकी काही जणांना आपले इन्स्टाग्राम अकाऊंट सुरू करण्यास व्यत्यय येत आहे. आम्ही याबाबत चौकशी करत आहोत. तुम्हाला होत असलेल्या गैरसोयीबद्दल क्षमस्व! (Instagram Down)

हेही वाचलंत का?

Back to top button