पुढारी ऑनलाईन डेस्क : इन्स्टाग्राम ॲपवरील लाईक्स, कॉमेंट आणि फॉलोअर्समुळे दोघा जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. एका अल्पवयीन मुलीने (वय.१७) आपल्या भावाच्या आणि मित्रांच्या मदतीने दाेन अल्पवयीन मुलांचा खून केल्याची धक्कादायक घटना राजधानी दिल्ली येथे घडली.
सोशल मीडियावर युझर्सच्या फालोअर्स आणि लाईक किती आहे, यावरुन साेशल मीडियावर किती फेमस आहे हे लक्षात येते; पण हेच फालोअर्स आणि लाईक दोघाजणांच्या खुनाला कारणीभूत ठरले आहे. दिल्लीतील भलस्वा डेयरी भागातील मुकंदपुर भाग -२ येथे राहणाऱ्या एक अल्पवयीन मुलीने आपल्या अल्पवयीन भाऊ आणि त्याच्या मित्रांच्या मदतीने एका युवकावर आणि त्याच्या अल्पवयीन मित्रावर हल्ला केला. हल्ल्यानंतर त्या दोघांना हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. पण उपचारादरम्यान त्या दोघांचाही मृत्यु झाला. या खुनाचे कारण वाचून तुम्हालाही धक्का बसेल.
पोलिसांच्या माहितीनुसार, इंस्टाग्रामवर लाईक आणि कॉमेंट करण्यावरुन आरोपी आणि मृतांमध्ये वाद झाला. अल्पवयीन मुलीने साहिलला धमकी दिली की "तू आमच्या गल्लीत येवून तर दाखव." त्यानंतर साहिल त्याचा मित्र निखिलसह गल्लीत आला. ही दोघ यायच्या अगोदरच काजलने आपल्या भावाला आणि गल्लीतील इंन्स्टाग्राम फॉलोअर्सना बोलावल होत. साहील आणि निखिल येताच त्यांनी त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. ही घटना समजताच पोलिस घटनास्थळी आले. साहील आणि निखिल या दोघांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले; पण उपचारा दरम्यान दोघांचाही मृत्यू झाला. ( Instagram Comment )
आरोपींना फाशी द्यावी. अशी मागणी मृत युवकांच्या नातेवाईकांनी केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोघाजणांना ताब्यात घेतले आहे. पोलिस त्या भागातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करत आहेत.
हेही वाचा :