Stock Market Updates : सेन्सेक्स ८०० अंकांनी घसरला, निफ्टी २०० अंकांनी खाली, ‘हे’ शेअर्स ठरले टॉप लूजर्स

Stock Market Updates : सेन्सेक्स ८०० अंकांनी घसरला, निफ्टी २०० अंकांनी खाली, ‘हे’ शेअर्स ठरले टॉप लूजर्स

पुढारी ऑनलाईन डेस्क : आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी (दि.१०) शेअर बाजारात (Stock Market Updates) घसरण दिसून येत आहे. प्री-ओपन सत्रात सेन्सेक्स सुमारे ६५० अंकांनी घसरल्याचे दिसून आले. तर निफ्टी १७,०९० च्या खाली आला होता. त्यानंतर बाजार खुला होताच सेन्सेक्सची घसरण वाढतच गेली. सकाळच्या सत्रात सेन्सेक्स सुमारे ७६७ अंकांनी घसरून ५७,३०० वर तर निफ्टी २४० अंकांनी घसरून १७०० वर व्यवहार करत होता. विशेषतः एशियन पेंट्स शेअर्स २ टक्क्यांने घसरले. (Stock Market Updates)

कमकुवत जागतिक संकेतांमुळे सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये आज सुरुवातीच्या व्यवहारांमध्ये घसरण झाली. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर वाढीमुळे गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली आहे. याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून येत आहे. शेअर बाजारात नकारात्मक वातावरण राहिल्याने बीएसईवरील १,९३१ शेअर्समध्ये घसरण होताना दिसत आहे. निफ्टी मिडकॅप शेअर्स १.१९ टक्के आणि स्मॉल कॅप ०.८२ टक्क्यांनी घसरल्याने मिड आणि स्मॉल कॅप शेअर्स कमजोर दिसत होते. टाटा मोटर्स, हिरो मोटोकॉर्प, ग्रासिम इंडस्ट्रीज, एचडीएफसी आणि अपोलो हॉस्पिटल्स आज NSE प्लॅटफॉर्मवर टॉप लूजर्स ठरले.

दरम्यान, रुपयाची घसरण सुरुच असून आज डॉलरच्या तुलनेत रुपया नीचांकी ८२.६४ वर खुला झाला. तेलाच्या किमती, वाढते ट्रेझरी उत्पन्न, कॉर्पोरेट आउटफ्लो आणि अमेरिकी चलनाची मागणी या पार्श्वभूमीवर अलीकडील काही सत्रांमध्ये रुपयाची नीचांकी घसरण झाली. रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडियालादेखील रुपयाची घसरण रोखण्यात यश आलेले नाही.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news