Insomnia : थंडीत निद्रानाशावर ही सोपी ‘ट्रिक’ वापरा आणि शांत झोपा

Insomnia
Insomnia
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : रात्रीची शांत झोप लागावी किंवा पडल्या पडल्या झोप लागावी यासाठी अनेकजण खास प्रयत्न करत असतात. पण निद्रादेवी काय लवकर प्रसन्न होण्याची चिन्ह दिसत नसतात. अशावेळी झोप येण्यासाठी पायाला तेल चोळणे, माथ्यावर तेल चोळणे असे अनेक उपाय केले जातात. पण तुम्हाला माहिती आहे का ? थंडीच्‍या दिवसामध्‍ये तुम्‍हाला निद्रानाशवर फक्त एक सोपा उपाय तुम्हाला उपयोगी ठरू शकतो. रात्री झोपताना पायात सॉक्स घालणं अनेकांना फारसं रुचत नाही. पण तुम्हाला माहिती आहे का? या गोष्टीचे अनेक फायदेही आहेत. जाणून घेवूया सॉक्स घालून झोपल्याने कोणते फायदे होतात याविषयी. Insomnia

तापमान : सॉक्स घालून झोपल्याने शरीराचं तापमान नियंत्रित राहायला मदत होते. त्यामुळे शरीर झोपेसाठी तयार होऊन झोप लवकर लागण्यास मदत होते. Insomnia

रक्ताभिसरण : सॉक्स घालून झोपल्याने शरीराचं रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते. शरीराला उत्तम प्रकारे ऑक्सीजनचा पुरवठा होण्यास मदत होते. त्यामुळे ह्रदयाचं आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते.

उबदार राहण्यास मदत : अनेकांचे थंड तापमानामुळे हात पाय गारठतात. अशा वेळी झोपताना सॉक्स घालून झोपल्यास ते उबदार राहण्यास मदत होते. त्यामुळे रात्री सतत होणारी झोपमोडही टळली जाते. Insomnia

हॉट फ्लॅश : अनेकदा महिलांना रजोनिवृत्ती दरम्यान हात आणि पायांचे तळवे अचानक तापण्याची समस्या सुरू होते. त्याला हॉट फ्लॅश म्हणतात. रात्री सॉक्स घालून झोपल्यास याचं प्रमाण कमी होण्यास मदत होते. Insomnia

Insomnia : ही काळजी जरूर घ्या

  • झोपताना सॉक्स घालणार असाल तर ते जास्त घट्ट असणार नाहीत यांची काळजी घ्या.
  • याशिवाय शक्यतो लोकरीचे किंवा कॉटनचे सॉक्स असावेत.
  • स्वच्छ सॉक्स वापरा जेणेकरून त्वचेवर कोणतंही इन्फेक्शन होणार नाही.

हे ही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news