Mauni Amavasya 2023 : यंदाच्या मौनी अमावस्येतील ‘खप्पर’ योगाने होणार ‘छप्परफाड’ लाभ | पुढारी

Mauni Amavasya 2023 : यंदाच्या मौनी अमावस्येतील 'खप्पर' योगाने होणार 'छप्परफाड' लाभ

पुढारी ऑनलाइन डेस्क : या मौनी अमावस्येला तब्बल 30 वर्षानंतर खप्पर योग येत आहे. यावेळी २१ जानेवारीला शनिवारी ही अमावस्या आली आहे. शनिवार हा शनिदेवाचा वार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, १७ जानेवारीला शनि देवाने ३० वर्षानंतर कुंभ राशीत गोचर केले आहे. तर मकर राशीत शुक्र आणि शनीची युती होत आहे. यामुळे जो विशेष संयोग बनला आहे. तो खप्पर योग आहे. (Mauni Amavasya 2023)

Mauni Amavasya 2023 : शनि दोषातून मुक्ती

शनिवारी आलेली मौनी अमावस्या आणि कुंभ राशीतील शनी गोचरमुळे ३० वर्षानंतर आलेला खप्पर योग हा शनी दोषातून मुक्ती मिळवण्यासाठी उत्तम समजला गेला आहे. त्यामुळे या दिवशी शनि देवाची पूजा करून त्यांची विशेष कृपादृष्टी मिळवता येऊ शकते. या दिवशी शमीच्या वृक्षाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्याने कुटुंबावरील सर्व शनि दोष दूर होतात.

साडेसाती अडीचकी असलेल्यांनी शनी देवाची अशी करा पूजा

शनिच्या साडेसातीतून मुक्ती मिळवण्यासाठी देखील या अमावस्येचा खप्पर योग महत्त्‍वपूर्ण आहे. नदीतील पवित्र स्नानानंतर शनी देवाची आरती करून शनी देवाला मोहरीचे तेल वाहा. शनी चालीसेचा पाठ करून शनीला काळे तीळ अर्पण करा. आरती करताना काळे वस्त्र परिधान करावे. त्यानंतर गरीबांना दानधर्म करावा. यामुळे शनी देवाची कृपा प्राप्त होऊन साडेसाती आणि अडीचकीचा प्रभाव कमी होण्‍यास होते.

Mauni Amavasya 2023 : खप्पर योगावर शनिदेवाला प्रसन्न करून मिळवा छप्परफाड लाभ

ज्या लोकांना शनिची साडेसाती, अडीचकी सुरू झाली आहे. ते वरील प्रकारे शनि देवाची पूजा करून साडेसातीतून मुक्ती मिळवू शकतात. मात्र, ज्यांना साडेसाती नाही त्यांनी या मौनी अमावस्येला शनि देवाची शास्त्रानुसार विशेष पूजा केल्यास शनिकृपेने त्यांना छप्परफाड लाभ मिळू शकतील. तसेच या दिवशी दानधर्म केल्याने अनेकांना मोठे लाभ प्राप्त होऊ शकतात.

( वरील माहिती ज्योतिष अभ्यासकांच्या मतानुसार दिलेली आहे, पुढारी ऑनलाइन त्याची हमी घेत नाही. उपाय करण्यापूर्वी जाणकारांचा सल्ला घ्यावा. )

हेही वाचा :

Back to top button