IndiGo Flight Emergency landing : बंगळूरहून वाराणसीला जाणारे १३७ प्रवासी थोडक्यात बचावले, इंडिगोचे इमर्जन्सी लँडिंग

IndiGo
IndiGo

पुढारी ऑनलाईन : बंगळूरहून वाराणसीकडे जाणार्‍या इंडिगो विमानाचे आज (दि.०४) सकाळी ६ वाजून १५ मिनिटांनी इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे तेलंगणातील शमशाबादमध्ये हे आपत्कालिन लँडिंग करण्यात आल्याने यातील १३७ प्रवासी थोडक्यात बचावले. सर्व प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने दिली आहे.

यापूर्वी केबिनचा दाब कमी झाल्याने इमर्जन्सी लँडिंग

यापूर्वी काल (दि.३) बंगळुरमधून जाणाऱ्या फ्लाइटमध्ये अडचण आली होती. बंगळूरहून अबुधाबीला जाणाऱ्या इतिहाद एअरवेजच्या फ्लाइट EY237 मध्येही तांत्रिक बिघाड झाला होता, त्यानंतर लगेचच त्याचे बंगळूरच्या विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. विमानाचे लँडिंग होताच वैमानिकाला विमानात काही समस्या असल्याचे लक्षात आले. वैमानिकाला विमानाच्या केबिनचा दाब कमी झाल्याचे आढळले, त्यानंतर त्याने इमर्जन्सी लँडिंग करण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news