INDW vs NZW 1st ODI : भारतीय महिला टीमचा न्यूझीलंडकडून ६२ धावांनी पराभव

INDW vs NZW 1st ODI : भारतीय महिला टीमचा न्यूझीलंडकडून ६२ धावांनी पराभव
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : सध्या भारतीय महिला क्रिकेट टीम न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील एक दिवसीय मालिकेत एकूण पाच सामने खेळवण्यात येणार आहेत. यातील पहिल्या एक दिवसीय  सामन्यात न्यूझीलंडच्या महिला संघाने भारतीय संघाचा ६२ धावांनी पराभव केला.

पहिल्यांदा फलंदाजी करताना यजमान न्यूझीलंडने भारतीय संघाला २७५ धावांचे आव्हान दिले होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना भारतीय संघ ऑल आऊट झाला. भारतीय संघाला २१३ धावांपर्यंत मजल मारता आली. यावेळी भारतीय कप्तान मिताली राजने केलेली अर्धशतकी खेळी भारताला विजयी करू शकली नाही. तिने ७३ चेंडूत ५९ धावा केल्या.

हा सामना न्यूझीलंडमधील क्वीन्सटाउन इव्हेंट सेंटर या मैदानावर खेळवण्यात आला. तत्पूर्वी भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या न्यूझीलंडच्या सलामीवीर फलंदाजांनी सुरूवातीपासून आक्रमक खेळीवर भर दिला.

भारताच्या दीप्ती शर्माने मॅडी ग्रीनच्या रूपात भारतीय संघाने न्यूझीलंडला पहिला धक्का दिला. त्यानंतर भारतीय संघ न्यूझीलंडला धक्के देत राहिला. न्यूझीलंडसाठी एका बाजूने खिंड लढवणारी सलामीवीर बेट्स भारतासाठी डोकेदु:खी ठरत होती. तिला आपल्या जाळ्यात ओढण्यात भारताची दीप्ती शर्मा यशस्वी झाली. बेट्सने आपल्यासंघासाठी १११ चेंडूत १०६ धावा केल्या. तिच्या शतकी व सॅटरथवेटने केलेल्या अर्धशतकी (६७ चेंडू,६३ धावा) खेळीच्या जीवावर न्यूझीलंडने भारतासमोर २७५ धावांचा डोंगर ऊभा केल्या.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news