पुणे; पुढारी ऑनलाईन : पुण्याच्या कोविड सेंटरमध्ये घोटाळा असल्याचे आरोप किरीट सोमय्यांनी केले होते. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी कोविड सेंटरमध्ये कोणताही घोटाळा नसल्याचे स्पष्ट केले. पुण्याचा कोविड सेंटरचे काम पारदर्शी चालले, असाही दावा त्यांनी केला.
पुण्याचे जिल्हाधिकारी सौरव राव यांच्याशी आमची बैठक झाली. त्यांनीही याबाबत योग्य ती माहिती दिली. पुण्यातील कोविड सेंटरचे काम व्यवस्थीत सुरू होते, असे पवार यांनी स्पष्ट केले. ते पुण्यातील कोरोनाच्या स्थितीवर पत्रकार परिषदेत बोलत होते.
राज्यात कोरोनाच्या तिसरी लाट काही प्रमाणात आटोक्यात आली आहे. परंतु पुण्यातील कोरोनाचा आकडा वाढत असल्याचे दिसत होते. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बैठक घेऊन आढावा घेतला. त्यांनी पुण्यातील कोरोनाच्या परिस्थिती आटोक्यात आल्याचे सांगितले. तसेच केंद्रासोबत चर्चा करून कोरोना अतिरिक्त डोस मागवणार असल्याची त्यांनी माहिती दिली.
पुण्यातील कोरोनास्थिती आटोक्यात आली आहे. मुंबईला गेल्यावर मंत्रिमंडळाची बैठक घेऊन केद्राला कोव्हॅक्सीन आणि कोव्हिशिल्डचे जादा डोसची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कोरोनाचे काही नियम अद्यापही लागू आहेत. ते निर्बंध कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्याशी चर्चा करणार आहे. पुण्यासारख्या ठिकाणी लहान मुलांचा लसीकरणाचा वेग मंदावला आहे. यावर लवकर बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याचे अजित पवार म्हणाले.