Lata Mangeshkar : गानसाम्राज्ञी लता मंगेशकर अनंतात विलीन

Lata Mangeshkar : गानसाम्राज्ञी लता मंगेशकर अनंतात विलीन
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतरत्न गानसाम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्यावर शिवाजी पार्क येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगेशकर कुटुंबियांचं सांत्वन केले. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पत्नी रश्मी ठाकरे, राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार उपस्थित होते.

त्याचबरोबर केंद्रीय मंत्री पियुष गोयल, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसे प्रमुख राज ठाकरे, खासदार सुप्रिया सुळे, बाळा नांदगावकर, भाजप सरचिटणीस विनोद तावडे भारतरत्न सचिन तेंडुलकर, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, छगन भुजबळ, दिग्दर्शक मधुर भांडारकर, अभिनेता शाहरुख खान आदी मान्यवर उपस्थित होते. (Lata Mangeshkar)

लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांना ८ जानेवारीला कोरोनाची लागण झाली होती. त्यांना कोरोनाची सौम्यं लक्षणं जाणवत होती. त्यांना न्यूमोनियाचीही लागण झाल्याचे समोर आले होते. यानंतर त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आयसीयू मध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. प्रकृतीत सुधारणा होऊ लागल्यानंतर २८ जानेवारीला त्यांना व्हेंटिलेटरवरुन काढण्यात आले होते. मात्र ५ फेब्रुवारीला प्रकृती बिघडल्याने त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. पण उपचादारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

हे वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news