Jasprit Bumrah and Sanjana | आशिया चषक दौरा सोडून मुंबईत परतलेल्या बुमराहनं दिली गुड न्यूज

Jasprit Bumrah and Sanjana | आशिया चषक दौरा सोडून मुंबईत परतलेल्या बुमराहनं दिली गुड न्यूज

मुंबई, पुढारी ऑनलाईन : आशिया चषक दौरा सोडून भारतात परतलेल्या जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याने गुड न्यूज दिली आहे. बुमराह आणि त्याची पत्नी संजना गणेशन यांना पुत्ररत्न झाले आहे. बुमराहने एक्सवर पोस्ट करत ही गुड न्यूज शेअर केली आहे. (Jasprit Bumrah and Sanjana)

पाकिस्तानविरुद्धचा सामना पावसामुळे ड्रॉ राहिल्याने आता नेपाळविरुद्धच्या लढतीकडे सार्‍यांचे लक्ष लागले आहे; पण त्या सामन्यात जसप्रीत बुमराह खेळणार नसल्याचे वृत्त समोर आले होते. कारण जसप्रीत तातडीने रविवारी कोलंबो येथून मुंबईसाठी रवाना झाला होता. बुमराह आशिया चषक सुरू असताना मुंबईत दाखल झाला. स्पर्धा मध्येच सोडून तो मुंबईत का आला, असा प्रश्न सर्वांना पडला होता. पण या प्रश्नाचे उत्तर त्याने क्रिकेट चाहत्यांना दिले आहे. त्याच्या कुटुंबात आता गोंडस बाळाचे आगमन झाले आहे.

"आमचे छोटे कुटुंब मोठे झाले आहे आणि आमची मने आमच्या कल्पनेपेक्षा अधिक भारावून गेली आहेत! आज सकाळी आम्ही आमच्या लहान बाळाचे 'अंगद जसप्रीत बुमराह'चे या जगात स्वागत केले. आम्ही आता चंद्रावर आहोत आणि आमच्या आयुष्यातील हा नवीन अध्याय घेऊन येणार्‍या प्रत्येक गोष्टीची वाट पाहू शकत नाही. ❤️ – जसप्रीत आणि संजना" अशी बुमराहने एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

जसप्रीत बुमराह आशिया चषक सोडून त्याच्या वैयक्तिक कारणामुळे कोलंबो येथून मुंबईला आल्याची माहिती समोर आली होती. आयर्लंड दौर्‍यावरून त्याने बर्‍याच कालावधीनंतर भारतीय संघात पुनरागमन केले आणि त्याच्या नेतृत्वाखाली भारताने ती मालिका जिंकली होती. त्यानंतर वन-डे संघात त्याचे पुनरागमन झाले. गोलंदाजीची संधी मिळाली नसली, तरी जसप्रीतने फलंदाजीत कमाल करून दाखवली; पण जसप्रीत रविवारी वैयक्तिक कारणामुळे मुंबईच्या दिशेने निघाला. तो नेपाळविरुद्धच्या सामन्यात खेळणार नाही. परंतु, सुपर-४ साठी तो पुन्हा श्रीलंकेत जाणार आहे. जसप्रीतच्या गैरहजेरीत मोहम्मद शमी प्लेईंग इलेव्हनमध्ये खेळेल. पाकिस्तानविरुद्ध त्याच्याजागी शार्दूलला संधी दिली गेली होती. (Jasprit Bumrah and Sanjana)

बुमराहच्या घरी गोंडस बाळाचं आगमन

जसप्रीतच्या मुंबईत परतण्यामागे वैयक्तिक कारण असल्याचे सुरुवातीला सांगितले गेले. त्याच्या घरी गोड बातमी येणार असल्याने तो मुंबईत परतला आणि आता जसप्रीत आणि त्याची पत्नी संजना गणेशन हे आई-बाबा झाल्याची बातमी समोर आली आहे. त्यांनी त्यांच्या पहिल्या बाळाचे जोरदार स्वागत केले आहे.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news