अमेरिकेत आणखी एका भारतीय वंशाच्‍या नागरिकाची हत्‍या

अमेरिकेतील भारतीय वंशाचे नागरिक विवेक तनेजा.
अमेरिकेतील भारतीय वंशाचे नागरिक विवेक तनेजा.

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : अमेरिकेमध्‍ये भारतीयांवर होणार्‍या हल्‍ल्‍यांचे सत्र कायम आहे. एकीकडे भारतीय विद्यार्थ्यांच्‍या हत्‍याचे प्रकार सु५ असतानाच आता वॉशिंग्‍टनमध्‍ये एका रेस्‍टॉरंटबाहेर वादावादीतून अज्ञात व्यक्तीने भारतीय वंशाच्‍या नागरिकाची हत्‍या केल्‍यास प्रकार समोर आला आहे. विवेक तनेजा (वय ४१ वर्ष) असे त्‍यांचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत. ( Indian-origin man killed in US )

विवेक तनेजा २ फेब्रुवारी रोजी वॉशिंग्‍टनमधील स्ट्रीट नॉर्थवेस्टच्या 1100 ब्लॉकमधील एका रेस्‍टॉरंटमध्‍ये गेले होते. पहाटे दोनच्‍या सुमारास रेस्‍टारंटबाहेर त्‍यांचा एका व्‍यक्‍तीबरोबर वाद झाला. दोघांमध्‍ये झटापट झाली. विवेक त्‍यांचे डोके फुटपाथवर आदळले. ते गंभीर जखमी झाले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तनेजा यांना रुग्‍णालयात दाखल केले.

वॉशिंग्टनमधील WUSA टेलिव्हिजनने दिलेल्‍या माहितीनुसार, तनेजा यांचे एका व्यक्तीशी वाद झाला. अज्ञात व्यक्तीने तनेजा यांना जमिनीवर फेकले आणि त्याचे डोके फुटपाथवर आदळले. रुग्‍णालयात उपचार सुरु असताना त्‍याचा ७ फेब्रुवारी रोजी त्‍यांचा मृत्‍यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी खुना गुन्‍हा दाखल केला अहे.

विवेक तनेजा हे डायनॅमो टेक्नॉलॉजीजचे सह-संस्थापक आणि अध्यक्ष होते. त्‍यांनी फेडरल गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टिंग सेक्टरमध्ये केले. या प्रकरणी मेट्रोपॉलिटन पोलिस डिपार्टमेंट (MPD) हत्येमध्ये सहभागी असलेल्या संशयिताला शोधण्यासाठी जनतेची मदत मागितली आहे.


अमेरिकेत भारतीयांवरील हल्‍ल्‍यांचे सत्र सुरु

नुकताच भारतीय विद्यार्थी सय्यद मजहीर अली याच्यावर शिकागोमध्ये दरोडेखोरांनी हल्ला केला होता. यापूर्वी जॉर्जियाच्या लिथोनिया शहरात एका ड्रग्सच्या आहारी गेलेल्या बेघर व्यक्तीने भारतीय विद्यार्थी विवेक सैनी याची हत्‍या केली होती. चिंताजनक बाब म्‍हणजे या वर्षी आतापर्यंत भारतीय वंशाच्या आणखी चार विद्यार्थ्यांचाही अमेरिकेत मृत्यू झाला आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news