Indian Football FIFA Rankings : पाच वर्षांनंतर भारतीय फुटबॉल संघाची ‘टॉप १००’ मध्ये झेप

Indian Football FIFA Rankings : पाच वर्षांनंतर भारतीय फुटबॉल संघाची ‘टॉप १००’ मध्ये झेप

पुढारी ऑनलाईन डेस्क : कर्णधार सुनील छेत्रीच्या नेतृत्वाखालील भारतीय पुरुष फुटबॉल संघाने लेबनॉन आणि न्यूझीलंडला मागे टाकून ताज्या FIFA जागतिक क्रमवारीत १०१ वरून १०० व्या स्थानावर झेप घेतली आहे. मार्च २०१८ साली भारतीय संघ फिफा क्रमवारीत ९९ व्या क्रमांकावर होता. यानंतर पाच वर्षांनी मुख्य प्रशिक्षक इगोर स्टिमॅक यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने आणखी एक चमकदार कामगिरी केली आहे. (Indian Football FIFA Rankings)

भारतीय संघ सध्या बेंगळुरू येथे SAFF चॅम्पियनशिपच्या उपांत्य फेरीसाठी तयारी करत आहे. बुधवारी (दि.२८) SAFF फुटबॉल चॅम्पियनशिपच्या 'ब' गटातील सामन्यात मालदीववर १-० असा विजय नोंदवत उपांत्य फेरीत धडक मारली. आता उपांत्य फेरीत भारतीय संघ दि. १ जुलै रोजी लेबनॉनशी भिडणार आहे. (Indian Football FIFA Rankings)

गेल्या वर्षीच्या तुलनेत भारताला चार स्थानांचा फायदा झाला आहे. भारतीय संघ प्रथमच एएफसी आशियाई चषक स्पर्धेच्या सलग दोन मोसमात सहभागी होण्यासाठी सज्ज झाला आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये VFF तिरंगी मालिकेत व्हिएतनामविरुद्ध ०-३ अशा पराभवाला सामोरे जावे लागले होते.

यानंतर स्टिमॅक यांच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाने अनेक यशस्वी सामने खेळले आहेत. भारत २०२३ मध्ये आतापर्यंत दोन अनिर्णित आणि सात विजयांसह अपराजित आहे. भारताने मार्चमध्ये झालेल्या ट्राय नेशन सिरीज आणि यावर्षी इंटरकॉन्टिनेंटल कप जिंकला आहे. यादरम्यान भारताने उच्च दर्जाच्या किर्गिस्तान आणि लेबनॉनचा पराभव केला आहे.

हेही वाचा;

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news