नवी दिल्ली : जगप्रवास करणारे व त्याबाबत विक्रमही घडवणारे अनेक असतात. कुणी स्वतः विकसित केलेल्या वाहनातून जगप्रवास करतो तर कुणी चक्क साध्या बोटीतून प्रवास करतो. कुणी एकटेच प्रवासाला जातो. आता तर याबाबत दोन भारतीय व्यक्तींनी एक अनोखा विक्रम केला आहे. दोघांनी सर्वाधिक वेगाने सात महाखंडांचा प्रवास करण्याचा विश्वविक्रम केला आहे. ( Travelling Seven Continents ) अवघ्या तीनच दिवसांमध्ये त्यांनी हा प्रवास केला आहे!
दोन भारतवंशीयांनी सर्वात वेगवान भ्रमंतीचा विक्रम नोंदवला आहे. डॉ. अली इराणी व सुजॉय मित्रा असे या दोघांचे नाव. त्यांनी सर्वाधिक वेगाने सात महाखंडांचा प्रवास केला. गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनुसार, त्यांनी 3 दिवस, 1 तास, 5 मिनिटे व 4 सेकंदात प्रवास पूर्ण केला. आशिया, आफ्रिका, युरोप, उत्तर-दक्षिण अमेरिका, अंटार्क्टिका, ओशनियाचा प्रवास केला. 4 डिसेंबर ते 7 डिसेंबरपर्यंत ते मेलबर्न ऑस्ट्रेलियात पोहोचले. त्यांचा हा वेगवान प्रवास सर्वांनाच थक्क करणारा आहे. जगातील सातही महाखंडांमध्ये केवळ तीन दिवसांमध्ये फिरून येणे ही अचंबित करणारीच बाब ठरली आहे.
हेही वाचा :