The signature : 'सही'त हे बदल करा आणि व्हा 'मालामाल', जाणून घ्या सही कशी असावी आणि तिचे फायदे | पुढारी

The signature : 'सही'त हे बदल करा आणि व्हा 'मालामाल', जाणून घ्या सही कशी असावी आणि तिचे फायदे

पुढारी ऑनलाइन डेस्क : आयुष्यातील अनेक समस्यांचे समाधान तुमच्या एका सहीमध्ये असते. विशेष करून आर्थिक समस्या सोडवण्याची ताकद तुमच्या एका सहीत असते. कारण, तुमची सही ही तुमची ओळख (The signature)असते. हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटत असेल. मात्र, अनेक अंकज्योतिषी तसेच जाणकार त्यांच्या अभ्यासाच्या आधारे, असे मत मांडतात.

तुमच्या मनाचे प्रतिबिंब तुमच्या सहीतून कागदावर उमटवत असते. तुमचा कोणताही आर्थिक व्यवहार तुमच्या सहीशिवाय पार पडत नाही. अगदी डिजिटल ट्रँझॅक्शन केले तरी देखील सुरुवातीला फॉर्म आणि डेबिट कार्डवर तुम्हाला तुमची सही करावी लागते. नंतरच डिजिटल आर्थिक व्यवहारांची अनुमती मिळते. त्यामुळेच तुमच्या सहीला (The signature) खूप जास्त महत्व असते. त्यामुळे तुमची सही कशी आहे यावर अनेकदा तुम्हाला होणारे फायदे तोटे तसेच अन्य समस्या यांचा संबंध असतो. याचा अभ्यास करणा-या अभ्यासकांनी आर्थिक फायदा होण्यासाठी आणि अन्य समस्यांवर मात करण्यासाठी तुमची सही कशी असावी याच्या काही टिप्स दिल्या आहेत.

लहान असावी (The signature)

अभ्यासक सांगतात सही शक्यतो लहान असावी. काही जणांची सही भली मोठी लांबलचक असते. ती तशी नसावी. सही जेवढी लहान तेवढी फायदे मोठे असतात.

डावीकडून उजवीकडे असावी (The signature)

सही ही शक्यतो डावीकडून उजवी कडे जाणारी असावी. अगदी तुम्ही डावखुरे असाल तरी सही कधीही उजवीकडून डावीकडे जाणारी नसावी.

खालून वर जाणारी असावी (The signature)

आपल्याला कायम प्रगती करायची असेल तर सही कायम खालून वर जाणारी असावी. जसे आपण यशाची एक-एक पायरी वर चढतो त्याप्रमाणे सही खालच्या दिशेकडून वरच्या दिशेकडे जाणारी असावी. अनेकांना प्लेन सही करण्याची सवय असते. अर्थात एकदम सरळ रेषेत सही करणे. मात्र, यामुळे अशा व्यक्ती एकाच पातळीवर अडकून पडतात. शक्यतो वर्षानुवर्षे त्यांची प्रगती होत नाही. किंवा त्यांना नोकरीत प्रमोशन मिळत नाही. आपल्याला जर यशाची उंच शिखरे गाठायची असतील. तर सही कायम खालून वर जाणारी असावी. त्यामुळे आपली प्रगती होते.

किचकट नसावी (The signature)

अनेक जण आपली सही ही खूप किचकट करून ठेवतात. मात्र, हे तुमच्या आयुष्यात खूप घातक ठरू शकते. किचकट सही असेल तर तुम्ही कायम इनफिनिटी प्रमाणेच फिरत राहाल, असे अभ्यासक सांगतात. सही कोणत्याही प्रकारे गोल-गोल नसावी किंवा अक्षरे एकमेकांमध्ये मिसळणारी नसावी. अगदी प्लेन सुटसुटीत सही असायला हवी…

शक्यतो आपले प्रथम नाव सहीसाठी वापरावे (The signature)

अनेक जण सहीसाठी आपले नाव उपनाव दोन्ही वापरतात. मात्र, यामुळे आपली सही लांबलचक होते. शिवाय तुमचे प्रथम नाव ही तुमची मुळ ओळख असते. असे असले तरी आजकाल अनेकजण आपल्या उपनावाला अधिक महत्व देताना दिसतात आणि आपल्या प्रथम नावाचे फक्त आद्याक्षर घेतात आणि मधले नाव आणि उपनाव संपूर्ण लिहितात. ही सहीमधील एक घोडचूक ठरते. तुमच्या सहीमध्ये तुमचे प्रथम नावच असायला हवे. कारण तीच तुमची खरी ओळख असते. अगदीच तुमच्या नावाचे स्पेलिंग तुमच्या जन्मतारखेशी जुळत नसेल तरच याविषयातील तज्ज्ञ तुम्हाला नावासह उपनाव सहीमध्ये करण्याचे सुचवतात. मात्र, शक्यतो प्रथम नावच सहीसाठी वापरावे.
नावाखाली अंडरलाइन आणि दोन डॉट देणे (The signature)

नावाखाली कधीही अंडरलाइन करून दोन डॉट देणे हे चांगले असते. असे अनेक जाणकार सांगतात. मात्र, काही तज्ज्ञांमध्ये दोन डॉट द्यावे की नाही याविषयी मतमतांतरे आहेत.

इंग्रजीतच सही करणे फायद्याचे (The signature)

अंकशास्त्राची सुरुवात जरी भारतात झाली असली तरी कोणत्याही भारतीय किंवा जगात कोणत्याही लिपीतील मुळाक्षरांचा संबंध अंकांशी जोडला गेलेला नाही. हा संबंध फक्त इंग्रजी लिपीतच जोडला गेलेला आहे. त्यामुळे अंकशास्त्राचे लाभ मिळवण्यासाठी सही आणि स्पेलिंग महत्वाचे ठरतात. आणि म्हणूनच आपल्या भाषेवर कितीही प्रेम असले तरी फायदे मिळवण्यासाठी सर्व कागदपत्रांवर इंग्रजीतच नाव लिहिणे आणि इंग्रजीतच सही करणे आवश्यक आहे, असे अभ्यासक सांगतात. तसेच तुमच्या नावाचे स्पेलिंग तुमच्या जन्मतारखेनुसार जुळवून घेण्याचा सल्लाही ते देतात.

कुठलेही अक्षर अंडरलाइन खाली जाता कामा नये (The signature)

इंग्रजीचे काही अक्षर रेषेखाली लिहिले जातात. उदाहरणार्थ लहान g,p,y इत्यादी. मात्र, सही करताना ही अक्षरे रेषेच्या वरच लिहावी. सही खाली केलेल्या अंडरलाइनच्या खाली ही अक्षरे जाता कामा नये.

शेवटच्या अक्षराचा पाय कायम वर जाणारा असावा

सहीतील शेवटच्या अक्षराचा पाय कायम वर जाणारा असावा. उदाहरणार्थ तुमच्या सहीतील शेवटचे अक्षर i असेल तर हा i असा स्टॅण्डिंग नसावा. तर तो कर्व्ह करून वरच्या दिशेने रोटेट करावा. ज्याचा अर्थ तुमची वरच्या दिशेने प्रगती होत आहे.

( वरील माहिती अंकज्योतिष ज्योतिष आदि अभ्यासकांच्या मतानुसार दिलेली आहे, कोणतेही बदल करण्यापूर्वी जाणकारांचा सल्ला घ्यावा, पुढारी ऑनलाइन त्याची हमी घेत नाही. )

हेही वाचा :

Back to top button