Womens World Cup 2022 : भारताचा उद्या पाकिस्‍तानशी मुकाबला, जाणून घ्‍या कोणत्‍या संघाचे आहे पारडे जड

women's world cup 2022 india vs pakistan
women's world cup 2022 india vs pakistan

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :
महिला क्रिकेट विश्‍वचषक स्‍पर्धेला न्‍यूझीलंडमध्‍ये शुक्रवार, ४ मार्चपासून प्रारंभ झाला आहे. आत्तापर्यंतचे विश्‍वचषक स्‍पर्धेचे रेकॉर्ड बघता ऑस्ट्रेलिया संघाने सर्वाधिक सहावेळा (६) विश्‍वचषकावर अआपलं नाव कोरले आहे. इंग्लडचा संघ ४ वेळा तर न्‍यूझीलंडचा संघ एकवेळा या स्पर्धेत चॅम्पियन बनला आहे. यंदा स्‍पर्धेत एकुण ८ संघ उतरले असून एकुण ३१ सामने होणार आहेत. उद्‍या ( दि. ६ ) मिताली राज हिच्‍या नेतृत्‍वाखाली भारतीय संघ पाकिस्‍तानशी मुकाबला करण्‍यासाठी मैदानात उतरले.

रविवारी (दि. ६) भारताचा पाकिस्‍तानशी मुकाबला होणार आहे. कोणत्‍या संघाचे पारडे जड राहणार याची क्रिकेटप्रेमींमध्ये चांगलीच उत्सुकता आहे. महिला क्रिकेट विश्‍वचषक स्‍पर्धेतील भारत आणि पाकिस्तान संघांचा आजपर्यंत रेकॉ्र्ड पाहता, भारत पाकिस्तानपेक्षा कितीतरी सरस ठरला आहे. भारतीय संघ २००५ आणि २०१७ मध्ये दोनदा उपविजेता ठरला होता. तर दुसरीकडे आजपर्यंत विश्‍वचषक स्‍पर्धेत पाकिस्तानचा महिला संघ एकदाही आपले स्थान निश्चित करू शकला नाही. २००९ च्या विश्‍वचषक स्‍पर्धेत भारतीय महिला संघ सर्वेात्तम सहा संघामध्ये होता. त्यामुळे रविवारी हाेणार्‍या सामन्‍यात भारतीय संघाचेच पारडं जड असल्याचे मानले जात आहे.

वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत आत्तापर्यंत दोन्ही संघात एकूण तीन सामने  झाले. यामधील सर्व सामने भारतानेच जिंकले होते. भारत-पाकिस्तान महिला संघाचा पहिला सामना २००९ मध्ये झाला होता, तेव्हा भारतीय संघाने १० विकेटने दणदणीत विजय मिळवला होता. त्यानंतर २०१३ मध्ये भारताने ६५ धावांनी सामना आपल्या खिशात घातला होता. २०१७ च्या वर्ल्ड कपमध्ये दोन्ही संघात मुकाबला झाला होता, यामध्ये भारतीय संघ ९५ धावांनी विजयी ठरला होता.

या दोन्ही संघांच्या एकदिवसीय विक्रमांबद्दल बोलायचे झाल्यास, दोघांमध्ये एकूण दहा सामने खेळले गेलेत, जवळपास सर्व सामन्यांमध्ये भारतीय संघ वरचढ ठरला आहे. भारतीय संघाने पाकिस्तानने कमीत कमी ८० धावांच्या फरकाने विजय मिळवला होता. या विक्रमांवरून हे स्पष्ट होते की, एकदिवसीय क्रिकेट सामन्यांमध्ये पाकिस्तानच्या संघाला भारतीय संघाशी कधीही टक्कर देता आलेली नाही. आता उद्‍या भारतीय महिला संघातील खेळाडूंच्‍या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचलत का ?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news