Kia Carens : जाणून घ्या भारतातील सर्व मॅाडेल्सची किंमत

Kia Carens : जाणून घ्या भारतातील सर्व मॅाडेल्सची किंमत

पुढारी ऑनलाईन डेस्क : किया (Kia) कंपनीने गेल्या महिन्यात त्यांची किया केरेन्स (Kia Carens) ही नवी कार लाॅन्च केली. या कारला ग्राहकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे लॉन्च होण्यापूर्वीच 19,000 युनिट्सचे बुकिंग या कारसाठी झाले. ही एक मल्टी युटिलिटी व्हेईकल (MUV) आहे. कंपनीने केरेन्स कार (Carens Car) 6-सीटर आणि 7-सीटर अशा दोन्ही पर्यायांमध्ये लॉन्च केली आहे.

भारतीय बाजारपेठेत किया केरेन्सची (Kia Carens) मारुती सुझुकी एर्टिगा (Maruti Suzuki Ertiga) आणि ह्युंदाई अल्काझर (Hyundai Alcazar) यासारख्या वाहनांशी थेट स्पर्धा आहे. आज आम्‍ही तुम्‍हाला किया केरेन्स कंपनीच्‍या सर्व प्रकारांच्‍या कारच्या किमतींबद्दल सांगणार आहोत. यानंतर, तुमच्या बजेटमध्ये कियाची कोणती कार सर्वात किफायतशीर असेल हे तुम्ही स्वतः ठरवू शकाल.

Kia Carens कारच्या भारतातील सर्व मॅाडेल्सच्या किंमती

  • 1. Premium –  i) पेट्रोल स्मार्टस्ट्रीम 1.5 मध्ये 8.99 लाख रुपये  ii) टर्बो पेट्रोल स्मार्टस्ट्रीम 1.4T मध्ये 10.99 लाख रुपये
    iii) डीजल 1.5 लीटर CRDi VGT मध्ये 10.99 लाख रुपये
  • 2. Prestige- i) पेट्रोल स्मार्टस्ट्रीम 1.5 मध्ये 9.99 लाख रुपये
    ii) टर्बो पेट्रोल स्मार्टस्ट्रीम 1.4T मध्ये 11.99 लाख रुपये
    iii) डिझेल 1.5 लीटर CRDi VGT मध्ये 11.99 लाख रुपये
  • 3. Prestige Plus- i) टर्बो पेट्रोल स्मार्टस्ट्रीम 1.4T मध्ये 13.49 लाख रुपये
    ii) डिजेल 1.5 लीटर CRDi VGT मध्ये 13.49 लाख रुपये
  • 4. Luxury- i) टर्बो पेट्रोल स्मार्टस्ट्रीम 1.4T मध्ये 14.99 लाख रुपये
    ii) डिझेल 1.5 लीटर CRDi VGT मध्ये 14.99 लाख रुपये
  • 5. Luxury Plus (6/7सीटर)- i) टर्बो पेट्रोल स्मार्टस्ट्रीम 1.4T मध्ये 16.19 लाख रुपये
    ii) डिझेल 1.5 लीटर CRDi VGT मध्ये 16.19 लाख रुपये

या सर्व Kia केरेन्स कारची किंमत भारतीय बाजारपेठेत 8.99 लाख रुपयांपासून ते 16.19 लाख रुपयांपर्यंत आहे. किया केरेन्स (Kia Carens) भारतीय बाजारपेठेत तीन इंजिनसह पहायला मिळेल. यामध्ये ग्राहकांना पेट्रोल आणि डिझेल दोन्हीचा पर्याय मिळतो. त्याचबरोबर 6MT, 6AT आणि 7DCT अशा तीन महत्त्वाच्या पर्यायांमध्ये देखील उपलब्ध असेल.

काय आहे 6MT, 6AT आणि 7DCT?

6MT यामध्ये iMT (इंटेलिजेंट मॅन्युअल ट्रान्समिशन) नियंत्रणांचा वापर होतो, ज्यामुळे गिअर्स बदलताना आपोआप इंजिन रोटेशन समायोजित करते, ड्रायव्हरसाठी सुरळीत गिअर शिफ्टिंग, असुविधाजनक रिकोइलची सुचना देते.

6AT मध्ये 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन हे इंधन खर्च आणि उर्जा यांचे सर्वोत्तम संयोजन देण्यासाठी सहा वेगवेगळे ड्राइव्ह गिअर्स आहेत. ट्रान्समिशन ऑटोमॅटिक असल्याने, कारला गिअर्स कधी बदलायची गरज आहे हे ठरवते. यामुळे चालकाला कार चालवणे हे अगदी सोपे होते.

7DCT मध्ये 7-स्पीड ड्युअल-क्लच ट्रान्समिशन (7DCT) विकसित केलेले आहे. 7-स्पीड डीसीटी हे एक स्पोर्टी ड्रायव्हिंग परफॉर्मन्ससाठी ड्रायव्हरला असा पर्याय उपलब्ध करून देते, ज्यामुळे सेकंदाच्या काही शंभराव्या भागामध्ये गिअर बदल केला जाऊ शकतो. ग्राहक ऑनलाइन किंवा कंपनीच्या अधिकृत डीलरशिपला भेट देऊन कार बूक करू शकतात. यासाठी 25000 रुपये टोकन रक्कम भरावी लागणार आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news