India vs China : पुढची ३ वर्षे भारतीय अर्थव्यवस्थेचीच व्याघ्रझेप; चीनला बसणार लगाम

India vs China : पुढची ३ वर्षे भारतीय अर्थव्यवस्थेचीच व्याघ्रझेप; चीनला बसणार लगाम
Published on
Updated on

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : जग मंदीच्या लाटेत आहे आणि भारतीय अर्थव्यवस्थेत तेजीच्या लाटा उसळत आहेत! गुड न्यूज म्हणजे… आगामी तीन वर्षांपर्यंत विकास दराच्या गतीत कुठलाही बडा देश भारताशी टक्कर घेण्याच्या स्थितीत नाही, असे 'एस अँड पी' या जागतिक मानांकन संस्थेनेही स्पष्ट केले आहे. (India vs China)

तीन वर्षांत भारतीय अर्थव्यवस्था सरासरी 6.7 टक्क्यांच्या वेगाने वाढेल, असे भाकीत 'एस अँड पी' संस्थेने केले आहे. भारताची ही व्याघ्रझेप चीनच्या 'ड्रॅगन'लाही पुरते मागे टाकणार आहे. या संस्थेकडून चीनचा विकास वृद्धी दर याआधी 5.5 टक्के वर्तविण्यात आलेला होता. नव्या अहवालात त्यात घसरण होऊन तो 5.2 टक्के राहील, असे म्हटलेले आहे. (India vs China)

2026 पर्यंत आशियातील उदयोन्मुख अर्थव्यवस्थांचा विकास दर चढा राहील. भारत, व्हिएतनाम आणि फिलिपाईन्स त्यात आघाडीवर असतील. चीन या यादीत नाही, हे विशेष! (India vs China)

'एस अँड पी' संस्था काय म्हणते?

  • 2022-23 या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था 7.2 टक्क्यांनी वाढली होती.
  • 2025-2026 दरम्यानही त्यात दरवर्षी सरासरी 6.9 टक्क्यांनी वाढ होईल, असे स्पष्टपणे दिसते.
  • 2023 मार्चच्या तिमाहीतही भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती अंदाजापेक्षा किती तरी पटीने उत्तम होती.

2023-26 संभाव्य वृद्धी

  • भारत 6.7 टक्के
  • व्हिएतनाम 6.6 टक्के
  • फिलिपाईन्स 6.1 टक्के
  • चीन 5.2 टक्के

अधिक वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news