शरद पवारांनी सरकार पाडलं ती मुत्सद्देगिरी, तर शिंदे बेईमान कसे?: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

File Photo
File Photo
Published on
Updated on

जळगाव;  पुढारी वृत्तसेवा :  काही लोकं आमच्या सरकारला नाव ठेवता, बेईमानीनं सरकार केलं म्हणता. मात्र, १९७८ मध्ये शरद पवार वसंतदादा पाटील यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये मंत्री होते. त्या मंत्रिमंडळातील ४० आमदार घेऊन ते बाहेर पडून मुख्यमंत्री झाले. तेव्हा त्यांना कुणी बेईमान न म्हणता, मुत्सद्देगिरी असल्याचे सांगितले. तर एकनाथ शिंदे बेईमान कसे झाले? असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.

जळगावात 'शासन आपल्या दारी' या अभियानाच्या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली, यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, १९७८ मध्ये शरद पवारांनी वसंतदादा पाटील यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये मंत्री होते. त्या मंत्रिमंडळातील ४० आमदार घेऊन पवारसाहेब बाहेर पडले आणि ते मुख्यमंत्री झाले. तेव्हाच्या भाजपसोबत त्यांनी सरकार स्थापन केलं. त्यावेळी त्यांना बेईमानी केल्याचे कुणी म्हटले नाही. तेव्हा पवार साहेबांची मुत्सद्देगिरी म्हटली गेली. आता तर शिंदे साहेबांनी विचारासाठी आणि विकासासाठी ते ५० लोकं घेऊन बाहेर येऊन सरकार स्थापन केलं. उलट शिंदे साहेबांनी तर भाजपसोबत निवडणूक लढवली आणि भाजपसोबतच सरकार स्थापन केलं. त्यामुळे शिंदे साहेबांनी केली तीसुध्दा मुत्सदेगिरीच आहे. त्यांना बेईमान म्हणणाऱ्यांपेक्षा मोठे बेईमान या राज्यात नाही. अशा गद्दारांना जनता जागा दाखवेन असे फडणवीस म्हणाले.

या वयात तरी काळी कामं सोडा

राज्यात मागील काळातील सरकार फेसबुक लाईव्ह होतं. आमचे सरकार बंद दारआड काम न करता, जनतेमध्ये जाऊन काम करते. त्यामुळेच जनतेचा प्रतिसादही मिळत आहे. चांगल काम केलं तरी काहींना मळमळ होते. काही लोकं काळे झेंडे दाखवतात, माझा त्यांना सल्ला आहे. या वयात तरी काळी कामं करणं सोडा, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

वर्षभरात जळगावला काय मिळाले?

जळगाव जिल्ह्यात पाच वर्षात वेगानं काम झाली. शेळगाव, वाघुर धरणासाठी तरतूद केली आहे. निम्म तापी पाडळसरे बलून बंधाऱ्याचा प्रकल्प आहे. त्यालाही लवकरच सुप्रमा देणार आहोत. त्याचेही काम लवकरच सुरु होणार आहे. बोदवड उपसा सिंचन योजनेचे ८० टक्के काम झाले आहे. जळगाव जिल्ह्यात २० हजार एकरवर ठिबक सिंचनासाठी सबसिडी दिली. वर्षभरात २१ हजार शेतकऱ्यांनी नव्याने ठिबक सिंचनाची व्यवस्था केली. ५० हजार शेतकऱ्यांना विम्याचे ३४ कोटी रुपये दिले. १ हजार शेतकऱ्यांना ट्रॅक्टर वाटप केले. नानाजी देशमुख कृषी समृध्दी योजनेत ५५० कोटी रुपये खर्च केले. राज्यात सर्वाधिक कांदा चाळी जळगाव जिल्ह्यात तयार केल्या आहेत. फळपीक विमा योजनेतून ४१९ कोटी रुपये दिले. नैसर्गिक आपत्तीपोटी १७९ कोटी रुपये भरपाई दिली आहे. आपलं सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे आहे. जलजीवन मिशन योजनेंतर्गंत जळगाव जिल्ह्यात १३५४ पाणी पुरवठा योजना केल्या, त्यामुळे प्रत्येक घरात पाणी मिळणार. रस्त्यांसाठी अडीच हजार कोटी रुपये दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news