BMC Vs Uddhav Thackeray Faction| मुंबई मनपा अधिकारी मारहाणप्रकरणी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना न्यायालयीन कोठडी | पुढारी

BMC Vs Uddhav Thackeray Faction| मुंबई मनपा अधिकारी मारहाणप्रकरणी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना न्यायालयीन कोठडी

पुढारी ऑनलाईन : मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यावर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी  केलेल्‍या हल्‍ला प्रकरणी चार पदाधिकाऱ्यांना आज (दि.२७ जून) सकाळी अटक करण्यात आली होती. त्यांना आज (दि.२७ जून)  वांद्रे न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी (BMC Vs Uddhav Thackeray Faction) सुनावली आहे, असे वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे.

मुंबईतील वाकोला पोलिसांनी बीएमसी अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री अनिल परब यांच्यासह १५ हून अधिक जणांवर गुन्हा दाखल (BMC Vs Uddhav Thackeray Faction) केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी ४ जणांना अटक केली असल्याची माहिती मुंबई पोलीसांनी दिली होती. दरम्यान, न्यायालयाने त्यांना ११ जुलैपर्यंत १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

उद्धव बाळासाहेब ठाकरे (UBT) गटाचे नेते अनिल परब यांचे नाव देखील या प्रकरणात नोंदवलेल्या ‘एफआयआर’मध्ये संशयित आरोपी म्हणून नमूद करण्यात आले आहे. मात्र ते अटकपूर्व जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात जाण्याची शक्यता असल्‍याचेही ‘एएनआय’ने वृत्तात म्‍हटले आहे.

BMC Vs Uddhav Thackeray Faction: काय आहे प्रकरण?

वांद्रे पूर्वेच्या अनधिकृत शाखेवर कारवाई करताना बाळासाहेब ठाकरे यांच्‍या फोटोवर हातोडा मारल्याचा आरोप करत सोमवारी (दि.२५ जून) दुपारी पालिकेच्या सांताक्रुझ एच- पूर्व विभागातील सहाय्यक अभियंत्याला ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण व जोरदार धक्काबुक्की केली. कार्यकर्त्यांनी दालनात घुसून सहाय्यक अभियंता अजय पाटील यांना फोटोवर हातोडा का मारला, अशी विचारणा केली. यावर पाटील यांनी अशा प्रकारे कोणतेही कृत्य करण्यात आलेले नाही, असे सांगितले. मात्र पालिका कार्यालयात मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते असल्यामुळे पाटील यांना आपला बचाव करता आला नाही. या घटनेनंतर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली होती.

हेही वाचा:

Back to top button