शुभ संकेत! भारत २०२७ मध्‍ये असेल जगातील तिसरी मोठी अर्थव्‍यवस्‍था : ‘जेपी मॉर्गन’चा अंदाज

प्रातिनिधिक छायाचित्र.
प्रातिनिधिक छायाचित्र.
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भारत २०२७ पर्यंत जगातील तिसरी-सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल, तसेच २०३० पर्यंत देशाच्‍या सकल राष्ट्रीय उत्पादनामध्‍ये (GDP ) दुप्पट वाढ होईल ते $7 ट्रिलियनपर्यंत ( ७ लाख कोटी डॉलर) पोहोचेल, असा अंदाज जेपी मोर्गनचा इंडेक्सने व्‍यक्‍त केला आहे. दरम्‍यान, पंतप्रधान कार्यालयानेही (पीएमओ ) 'X' वर पोस्‍ट करत याची दखल घेतली आहे. (  JPMorgan's forecast )

JPMorgan's forecast : २०३० पर्यंत देशाच्‍या 'जीडीपी'त हाेणार दुप्पट वाढ

जेपी मॉर्गनचे एशिया पॅसिफिक इक्विटी रिसर्चचे व्यवस्थापकीय संचालक जेम्स सुलिव्हन यांनी CNBC-TV18 ला दिलेल्‍या मुलाखतीमध्‍ये म्‍हटलं आहे की, भारत २०२७ पर्यंत जगातील तिसरी-सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनत असल्याचे पाहत आहोत. तसेच २०३० पर्यंत देशाच्‍या सकल राष्ट्रीय उत्पादनामध्‍ये (GDP ) दुप्पट $7 ट्रिलियनपर्यंत पोहोचेल.

दीर्घकालीन विचार केल्‍यास आम्ही भारतीय अर्थव्यवस्थेच्या एकूण संरचनेत मोठ्या प्रमाणात बदल पाहतो. देशाची एक मजबूत एकूण बाजारपेठ असेल.पुढील सात वर्षांमध्‍ये भारताच्या 'जीडीपी'मध्ये १७ टक्‍क्‍यांवरुन जवळपास २५ टक्‍क्‍यांपर्यंत वाढ होतना दिसत आहे. तसेच भारताची निर्यात दुप्पट म्‍हणजे एक ट्रिलियन डॉलर्सपेक्षा जास्त होईल, असेही अपेक्षा त्‍यांनी व्‍यक्‍त केला आहे.

असे संकेत मिळत आहेत की, चीन नवीन प्रोत्साहन उपक्रमाद्वारे 2023 च्या अर्थसंकल्पीय तूट वाढविण्याचा विचार करत आहे. या रणनीतीमध्ये किमान एक ट्रिलियन युआन, $137 बिलियनच्या समतुल्य, अतिरिक्त सरकारी कर्जामध्ये, या निधीचा पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये चॅनल करण्याच्या उद्देशाने समावेश आहे. चीनमधील कमी सरासरी कमाईच्या पुनरावृत्तीकडे लक्ष वेधत चीनमधील आर्थिक फुगवटा अनेकदा नवीन संधी आणि आव्हानांना कारणीभूत ठरू शकतो. तसेच गुंतवणूकदारांसाठी उत्सुकतेचा विषय बनतो, असेही जेम्स सुलिव्हन यांनी नमूद केले.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news