GDP : चालूवर्षी जीडीपी दर ६.४ टक्के राहण्याचा आशियाई विकास बॅंकेचा अंदाज | पुढारी

GDP : चालूवर्षी जीडीपी दर ६.४ टक्के राहण्याचा आशियाई विकास बॅंकेचा अंदाज

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : चालू आर्थिक वर्षात देशाचा जीडीपी दर ६.४ टक्के इतका राहण्याचा अंदाज आशियाई विकास बॅंकेने (ADB) व्यक्त केला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेतील तेजी कायम राहील, असे सांगतानाच पुढील आर्थिक वर्षात जीडीपी दर ६.७ टक्के इतका राहील, असेही एडीबीने म्हटले आहे.

आगामी काळात भारतासह आशियाई देशांत महागाई कमी होण्याचा अंदाज आहे. आशियाई देशांचा महागाई दर चालूवर्षी ३.६ टक्के तर पुढील वर्षी ३.४ टक्के इतका राहू शकतो. वर्ष २०२२-२३ मध्ये भारताचा जीडीपी दर ७.२ टक्के इतका नोंदविला गेला होता. जगातील अनेक देश विकासाच्या बाबतीत झगडत असताना भारताने ही कामगिरी साध्य केली होती. घरगुती मागणी आणि सेवा क्षेत्राचा झपाट्याने होत असलेला विस्तार भारताच्या विकासासाठी पूरक ठरत आहे, असेही एडीबीने आपल्या अहवालात म्हटले आहे.

हेही वाचा : 

Back to top button