India Corona Update : दिलासादायक! कोरोना रुग्णसंख्येत घट; देशात गेल्या २४ तासांत ७,५३३ नवे रुग्ण

India Corona Update : दिलासादायक! कोरोना रुग्णसंख्येत घट; देशात गेल्या २४ तासांत ७,५३३ नवे रुग्ण

पुढारी ऑनलाईन डेस्क : गेल्या २४ तासांत भारतात कोरोना संसर्गाचे ७,५३३ नवीन रुग्ण आढळले आहेत. जागतिक महामारी कोरोनाची भीती गेल्या काही दिवसांपासून भारतात सातत्याने डोके वर काढताना दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येत चढउतार होत आहे. मात्र, हवामानातील बदलादरम्यान पुन्हा एकदा कोरोनाच्या नवीन रुग्णसंख्येवर परिणाम होत आहे. गेल्या दहा आठवड्यांपासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. तथापि, या दरम्यान दैनंदिन प्रकरणांमध्ये अधूनमधून घट होत आहे. (India Corona Update )

२४ तासात कोरोनाचे ७,५३३ नवीन रुग्ण आढळले

गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोना अपडेटच्या प्रकरणांनी पुन्हा जोर पकडला आहे. मात्र, कालच्या तुलनेत आजही देशात कोरोनाच्या दैनंदिन रुग्णांमध्ये थोडीशी घट झाली आहे. तर काल (दि.२८) ९ हजार ३५५ कोरोना रूग्णांची नोंद झाली होती. आज नव्या रुग्णांची नोंद ७ हजार ५३३ इतकी झाली आहे.

मुंबईत आजपासून नोजल व्हॅक्सीन

देशभरात कोरोनाच्या प्रकरणांनी पुन्हा वेग घेतला आहे. कोविड प्रकरणांमध्ये सातत्याने वाढ होत असताना महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईतील वाढती कोरोना प्रकरणे लक्षात घेता, भारतातील पहिली कोविड नोजल व्हॅक्सीन (iNCOVACC) मुंबईत आजपासून (दि.२८) ६० वर्षांवरील नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहे. माहितीनुसार, ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना कोविशील्ड किंवा को लसीचा दुसरा डोस मिळाल्यानंतर सहा महिन्यांनी iNCOVACC चा डोस मिळू शकतो. हे लसीकरण २४ केंद्रांमध्ये केले जाणार आहे.

महाराष्ट्रात ७५४ नवे रुग्ण

महाराष्ट्रात कोरोनाची गुरुवारी ७५४ नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. जी बुधवारी नोंदवलेल्या ७८४ ताज्या प्रकरणांपेक्षा ४% कमी आहे. मुंबईत १३५ नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. जी एका दिवसापूर्वी नोंदवलेल्या १८५ प्रकरणांपेक्षा २७% कमी आहेत. तथापि, महाराष्ट्रात मुंबई, पुणे आणि नागपूरमधील प्रत्येकी एकासह तीन मृत्यूची नोंद झाली आहे.

India Corona Update : देशात कोविडची स्थिती काय आहे?

शासनाकडून गुरुवारी (दि.२७ ) जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत भारतात कोरोनाचे ९३५५ नवीन रुग्ण आढळले. त्याचबरोबर २४ तासांत २६ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. राजधानी दिल्लीत गेल्या २४ तासांत ५२२७ कोरोना चाचण्यांमध्ये ८६५ बाधित रुग्णांची पुष्टी झाली आहे. याशिवाय देशात कोरोनामधून बरे झालेल्यांची संख्या ४ कोटी ४३ लाख ३५ हजार ९७७ झाली आहे. त्याच वेळी, कोरोना लसीचे एकूण २२०,६६,५४,४४४ डोस देण्यात आले आहेत. कोविड रुग्णांची एकूण संख्या ४.४९ कोटींवर पोहोचली आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news