

कॅनबेरा : गेल्या दोन वर्षांत कोव्हिड आणि मास्क हा परवलीचा शब्द बनला होता. आता कोरोनाची तीव्रता कमी झाली आहे. मागील वर्षी कोरोना प्रतिबंधासाठी नो मास्क नो एंट्री हे फलक तर आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला होता. आता ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी मास्कविषयी नव्याने संशोधन करून त्याचे निष्कर्ष जाहीर केले आहेत. ( Face Mask Use ) या संशोधनानुसार फेस मास्क घातल्याने काही परिस्थितींमध्ये तात्पुरते निर्णय घेण्यास अडथळा येऊ शकतो. पीएनएएस जर्नलमध्ये हा अभ्यास प्रकाशित झाला आहे.
डॉ. डेव्हिड स्मर्डन यांनी कोविड-19 साथीच्या आजारापूर्वी आणि त्यादरम्यान 18 देशांमध्ये आठ हजारांहून अधिक लोकांनी खेळलेल्या सुमारे तीस लाख बुद्धिबळ चालींचे विश्लेषण केले. त्यानुसार मास्क घातेलेल्या खेळाडूंची निर्णयक्षमताघटल्याचे त्यांना संशोधनाअंती आढळून आले. सध्या सामान्य लोकांवर मास्क घातल्याचे मोठे परिणाम झाल्याचे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या विषयावर आणखी संशोधन होणे गरजेचे आहे. तूर्त आम्ही बुद्धिबळ या एकाच खेळासंबंधी संशोधन केले आहे.
मास्क परिधान केल्यामुळे माणसाच्या निर्णयशक्तीवर त्याचा परिणाम होतो, असे दिसून आले आहे. त्यामुळे मास्क कधी आणि किती वेळ वापरावा याचा आराखडा निश्चित करावा लागेल. ऑस्ट्रेलियातील नामांकित बुद्धिबळपटूंच्या मते मास्कमुळे कोविडकाळात आमचे चांगले रक्षण झाले. तथापि, नव्याने समोर आलेल्या मास्कबद्दल नव्याने समोर आलेल्या माहितीबद्दल एवढ्यातच काही सांगता येणार नाही.
हेही वाचा :