कोरोना वाढतोय; काळजी घ्या !

कोरोना वाढतोय; काळजी घ्या !
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येने चिंता वाढवायला सुरुवात केली आहे. मार्च महिन्यात राज्यातील दैनंदिन रुग्णांची संख्या दुपटीने वाढत आहे. मागील आठवड्यातील साधारणपणे 200 असणार्‍या दैनंदिन रुग्णसंख्येने आता 400 चा टप्पा गाठला आहे. कोरोनाचे प्रमाण हळूहळू वाढत असल्याने आरोग्ययंत्रणा सतर्क झाली आहे. दवाखान्यांमधील साधनसामग्री, मनुष्यबळ, प्रयोगशाळा सज्ज ठेवण्याचे आदेश शासनातर्फे देण्यात आले आहेत.

त्याचप्रमाणे, चाचण्या वाढवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. रविवारी राज्यात 397 कोरोनाबाधितांचे निदान झाले. एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू झालेला नाही, तर 236 रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात मार्च 2020 ते 2023 या तीन वर्षांच्या कालावधीत तपासण्यात आलेल्या 8 कोटी 65 लाख 83 हजार 11 नमुन्यांपैकी 81 लाख 41 हजार 854 नमुने म्हणजेच 9.40 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

पुण्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, सध्या राज्यात 2 हजार 117 सक्रिय रुग्ण आहेत. त्यामध्ये सर्वाधिक सक्रिय 597 रुग्ण पुणे जिल्ह्यात असून, त्यापाठोपाठ मुंबईत 558, तर ठाण्यामध्ये 374 सक्रिय रुग्ण आहेत. वाढती रुग्णसंख्या पाहता, मास्कसक्ती केली जाण्याची शक्यता वर्तवली जा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news