राष्ट्रपती भवनातील निमंत्रण पत्रिकेवर ‘इंडिया’ चा उल्लेख ‘भारत’; विरोधक आक्रमक

india bharat
india bharat

पुढारी ऑनलाईन डेस्क:  G20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रभती भवनातून आलेल्या अधिकृत निमंत्रण पत्रिकेवर  "प्रेसिडेंट ऑफ इंडिया" ऐवजी "प्रेसिडेंट ऑफ भारत" असा उल्लेख करण्यात आला आहे. यावरून देशातील राजकारण तापले आहे. नामांतराच्‍या मुद्यावर  विरोधी आघाडीतील अनेक पक्ष आक्रमक झाले असून, त्यांनी तीव्र शब्दात याचा निषेध नोंदवला आहे. (india bharat)

india bharat: …आम्ही खचून जाणार नाही : जयराम रमेश

पंतप्रधान मोदी हे सतत इतिहासाचे विकृतीकरण करत आहेत. जो भारत अनेक राज्यांचा संघ आहे. त्याला विभाजित करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे; पण आम्ही खचून जाणार नाही. शेवटी इंडिया आघाडीतील पक्षांचे उद्दीष्ट हे 'भारतात सौहार्द, सलोखा आणि विश्वास आणणे हाच आमचा प्रयत्न असल्याचे काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी म्हटलं आहे. ('India' Change 'Bharat')

यात नवीन काय?- ममता बॅनर्जी

कोलकाता येथे बोलताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या, इंग्रजीत आम्ही इंडिया आणि 'इंडियन कॉन्स्टिट्युशन' म्हणतो. तर हिंदीत 'भारत का संविधान' तर यात नवीन काय? परंतु इंडिया हे नाव जगाला माहित आहे. अचानक असे काय झाले की, सत्ताधाऱ्यांना देशाचे नाव बदलावे लागले, असा सवालही ममता बॅनर्जी यांनी केला. (india bharat)

पीएम मोदींना 'इंडिया' या शब्दाची अडचण : काँग्रेस नेते पवन खेडा

पीएम मोदींना 'इंडिया' या शब्दाची अडचण आहे. म्हणून ते 'इंडिया' बदलून 'भारत' करत आहेत. मोदीजी, संपूर्ण जग तुमच्यावर हसत आहे. तुम्ही आमचा, आमच्या नेतृत्वाचा, आमच्या विचारसरणीचा तिरस्कार करता आम्हाला काही अडचण नाही; पण भारताचा, भारतीयांचा द्वेष करू नका, असे मत काँग्रेस नेते पवन खेडा यांनी व्यक्त केले आहे.

'इंडिया' म्हणजेच 'भारत' : दिग्विजय सिंह

भारतीय संविधानात 'इंडिया' दैट इज 'भारत' असा उल्लेख केला आहे. त्यांनी मी भारतीय राज्यघटनेचा हवाला देत सांगतो की, 'इंडिया' म्हणजेच 'भारत', असे मत काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी व्यक्त केले आहे. राष्ट्रपती भवनातातून 'भारताच्या राष्ट्रपतींच्या' नावाने पाठवलेले G20 शिखर परिषदेच्या डिनरचे आमंत्रणावरील उल्लेखावर ते बोलत होते.

पंतप्रधानांनी स्किल इंडिया, डिजिटल इंडिया नावात बदल करावा-संदिप दीक्षित

'इंडिया' हा शब्द गुलामगिरीचे प्रतीक असेल तर सर्वप्रथम हे पंतप्रधानांना सांगा. स्किल इंडिया, डिजिटल इंडिया, असे पंतप्रधान म्हणाले होते. त्यांना आधी प्रश्न विचारले पाहिजेत. त्यांनी आधी या सगळ्या गोष्टी बदलायला हव्यात आणि मग काहीतरी करायला हवं. आपल्या संविधानाच्या प्रस्तावनेत 'इंडिया दॅट इज 'भारत' असा उल्लेख आहे. भारत हा शब्द अनेक संदर्भ आणि संस्कृतींमध्ये प्रचलित आहे. मला वाटत नाही की, नाव बदलल्याने काही फरक पडेल, असे मत काँग्रेस नेते संदीप दीक्षित यांनी व्यक्त केले आहे.

प्रत्येक योजनेपासून मंत्रालयापर्यंत 'इंडिया' नाव कुठून काढणार?- तेजस्वी यादव

पंतप्रधान मोदी इंडिया आघाडीला घाबरले आहेत, हे यावरून स्पष्ट होते. आमचा नारा "जुडेगा भारत, जीतेगा इंडिया" आहे. काही दिवसांपूर्वी ते 'व्होट फॉर इंडिया' म्हणायचे, मात्र आता ते 'भारत' लिहित आहेत. इंडिया हे नाव कुठून कुठून काढणार? पीएम मोदी यांच्या जहाजात देखील इंडिया आहे. प्रत्येक योजना आणि मंत्रालयातूनही इंडिया हे नाव हटवावे लागेल. एका राज्याचा अर्थसंकल्प होईल इतका खर्च हे एक नाव बदलण्यासाठी करतील, असे बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी म्हटले आहे.

इंडिया आघाडी निर्माण झाल्यानंतर भाजपच्या मनात नवा द्वेष – गौरव गोगोई

ISRO ने पाठवलेले चांद्रयान हे गुलामगिरीचे प्रतीक आहे का? IIT मध्ये असलेल्या इंडिया हे बदलणार का? IIT गुलामगिरीचे प्रतीक आहे का? इंडिया आघाडी निर्माण झाल्यानंतर भाजपच्या मनात नवा द्वेष जागृत झाला आहे. 2014 पासून आजपर्यंत भाजपला 'इंडिया' या शब्दाची कोणतीही अडचण नव्हती. सरकार लोकांचे लक्ष मुख्य मुद्द्यांवरून हटवण्याचा प्रयत्न करत आहेत, असे मत काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी व्यक्त केले आहे.

त्यांनी राष्ट्रपती भवनाचा त्याग करावा – अधीर रंजन चौधरी

मला वाटतं पंतप्रधान स्वत: 'INDIA' या नावाला घाबरतात. ज्या दिवसापासून INDIA नावाची आघाडी झाली त्या दिवसापासून PM मोदींचा भारत नावाबद्दलचा द्वेष वाढला आहे. जर ते इंग्रजांच्या विरोधात असतील तर त्यांनी राष्ट्रपती भवनाचा त्याग करावा जे व्हाईसरॉयचे घर होते, असे मत काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी निमंत्रण पत्रिकेवर इंडिया चे भारत या केलेल्या बदलावर त्यांचे मत व्यक्त केले आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news