पुणे : तब्बल २८ किलो ५०० ग्रॅम गांजा जप्त

इंदापूर पोलिसांनी जप्त केलेला मुद्देमाल.
इंदापूर पोलिसांनी जप्त केलेला मुद्देमाल.

इंदापूर : पुढारी वृत्तसेवा : इंदापूर पोलिसांनी टोयोटा कंपनीच्या कारमधून बेकायदेशीररीत्या २८ किलो ५०० ग्रॅम वजनाचा गांजा विक्रीसाठी घेऊन जात असताना जप्त करीत सुमारे १८ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. इंदापूर पोलिस ठाण्यांतर्गत अवैध धंद्याविरुध्द पोलिसांची ही सलग सहावी मोठी कारवाई असल्याचे पोलिस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांनी सांगितले.

अपघातग्रस्त कारमधून पोलिसांना मिळून आलेला गांजा हा दोन पंचांसमक्ष पंचनामा करून त्याचे मोजमाप केले आहे. हा २८ किलो ५०० ग्रॅम गांजा (किंमत अंदाजे सहा लाख) व एक टोयोटा कंपनीची कार (आरजे ०६ सीई ९२२८, किंमत अंदाजे १२ लाख) असा एकूण १८ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल इंदापूर पोलिसांकडून जप्त करण्यात आला आहे. या कारच्या अज्ञात चालक व मालकाविरुध्द विविध कलमान्वये इंदापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, इंदापूरचे पोलिस अधिकारी व अंमलदार हे संत तुकाराम महाराज पालखी मुक्काम इंदापूर शहरात असल्याने रात्री गस्त करीत होते. या वेळी 'देशपांडे व्हेज हॉटेल'समोर सेवारस्त्यालगत एक टोयोटा कंपनीच्या कारचा अपघात झाला असून, या कारने अज्ञात वाहनास पाठीमागून धडक दिल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. या कारचा चालक व मालक हे कार सोडून पळून गेले आहेत, अशी माहिती मिळाल्याने पोलिसांनी घटनास्थळाला भेट दिली असता चारचाकी गाडीच्या डिकीमधून उग्र वास येत असल्याचे जाणवले. पोलिसांनी कारची डिकू उघडून पाहिली असता त्यामध्ये गांजा भरून ठेवलेल्या पिशव्या दिसून आल्या. त्यानंतर कारवाई करून मुद्देमाल जप्त करण्यात आला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news