IND vs WI : लंचपर्यंत वेस्ट इंडिज ४ बाद ६८

IND vs WI : लंचपर्यंत वेस्ट इंडिज ४ बाद ६८

पुढारी ऑनलाईन डेस्क :  सध्या टीम इंडिया वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्याची सुरूवात टीम इंडिया कसोटी सामन्याने करत आहे. दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज (दि.१२) डॉमिनिका येथे खेळवण्यात येत आहे. सामन्यात वेस्ट इंडिजचा कर्णधार क्रेग ब्रॅथवेटने टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

सामन्यात प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी संयमी खेळी करत १२ षटकापर्यंत नाबाद ३० धावा केल्या. सामन्याच्या १३ व्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी आलेल्या रविचंद्रन अश्विनने विंडिजच्या सलामीजोडीला खिंडार पाडले. त्याने षटकाच्या पाचव्या चेंडूववर चंद्रपॉलला १२ धावांवर क्लीन बोल्ड करत विंडीजला पहिला धक्का दिला.  चंद्रपॉलने आपल्या खेळीत ४४ चेंडूत १२ धावा केल्या.

यानंतर  सामन्याच्या १७ व्या षटकात अश्विनने रोहित शर्माकरवी ब्रेथवेटला झेलबाद करत वेस्ट इंडिजला दुसरा धक्का दिला.   ब्रेथवेटने आपल्या खेळीत ४६ बॉलमध्ये २० धावांची खेळी केली. तर  १९ व्या षटकात शार्दुल ठाकूरने रेमन रायपरला बाद करत विंडिंजला तिसरा धक्का दिला. रेमनने आपल्या खेळीत १८ बॉलमध्ये २ धावा केल्या. २८ व्या षटकामध्ये फिरकीपटू रवींद्र जडेजाने जर्मेन ब्लॅकवूडला मोहम्मद सिराजकरवी झेलबाद करत वेस्ट इंडिजला चौथा धक्का दिला. ब्लॅकवूडने ३४ चेंडूत १४ धावा केल्या. या विकेटनंतर अंपायरनी लंच ब्रेकची घोषणा केली. (IND vs WI)

लंच ब्रेक

ब्लॅकवुड आऊट होताच लंचची घोषणा झाली. लंचपर्यंत वेस्ट इंडिजने चार विकेट गमावत ६८ धावा केल्या. यामध्ये तेजनरीन १२, ब्रेथवेट २०, रेमन रायपर २ आणि ब्लॅकवूड १४ धावा करून तंबूत परतले. तर, अ‍ॅलीक एथानेज २६ चेंडूत १३ धावा करून नाबाद आहे. भारताकडून अश्विनने दोन विकेट घेतल्या. तर, शार्दुल ठाकूर आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक यश विकेट घेतली आहे. (IND vs WI)

सामन्यासाठी संघ :

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, इशान किशन (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज

वेस्ट इंडिज : क्रेग ब्रॅथवेट (कर्णधार), टॅगेनारिन चंदरपॉल, रेमन रेफर, जर्मेन ब्लॅकवुड, अलिक अथनाझे, जोशुआ दा सिल्वा (यष्टीरक्षक), जेसन होल्डर, रहकीम कॉर्नवॉल, अल्झारी जोसेफ, केमार रोच, जोमेल वॉरिकन ((IND vs WI))

हेही वाचा;

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news