

पुढारी ऑनलाईन : भारतीय शेअर बाजारात आज अस्थिरता दिसून आली. सेन्सेक्स (Sensex) २२३ अंकांनी घसरून ६५,३९३ वर बंद झाला. तर निफ्टी (Nifty) ५५ अंकांनी खाली येऊन १९,३८४ वर स्थिरावला. अमेरिकेतील बाजारातील सकारात्मक संकेतांचा मागोवा घेत आज सेन्सेक्स आणि निफ्टीने तेजीत सुरुवात केली होती. पण त्यानंतर दोन्ही निर्देशांक घसरून बंद झाले. IT, मेटल शेअर्समधील विक्रीमुळे दबाव निर्माण झाला. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक प्रत्येकी ०.५ टक्क्यांनी वधारले.
LTIMindtree, अदानी एंटरप्रायझेस, अल्ट्राटेक सिमेंट, इन्फोसिस आणि BPCL हे निफ्टीवरील टॉप लूजर्स होते. तर ओएनजीसी आयशर मोटर्स, नेस्ले इंडिया, JSW स्टील आणि कोटक महिंद्रा बँक हे शेअर्स वाढले. क्षेत्रीयमध्ये फार्मा, पीएसयू बँक यांनी हिरव्या हिरव्या चिन्हात व्यवहार केला. तर आयटी आणि बँकिंग स्टॉक्समध्ये विक्री दिसून आली.
जीएसटी कौन्सिलने ऑनलाइन गेमिंग, हॉर्स रेसिंग आणि कसिनोवर २८ टक्के GST आकारण्यास मंजुरी दिल्यानंतर गोव्यातील कॅसिनो ऑपरेटर डेल्टा कॉर्पचे शेअर्स (Delta Corp shares) बुधवारच्या व्यवहारात २८ टक्क्यांपर्यंत घसरून १७८.२० रुपयांवर आले. या शेअर्सची ही ५२ आठवड्यांच्या निचांकी पातळी आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या वस्तू व सेवा कर (जीएसटी) परिषदेच्या बैठकीत अनेक महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा करीत निर्णय घेण्यात आले. या बैठकीत ऑनलाईन गेमिंग वर २८ टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय चर्चेअंती घेण्यात आला. या बैठकीत ऑनलाईन गेमिंगसह घोड्यांची शर्यत, कसिनोच्या एकूण किमतीवर २८ टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने ((डीजीसीए) विमान वाहतूक सेवा देणाऱ्या स्पाईसजेटवर देखरेख वाढविल्याच्या वृत्तामुळे स्पाईसजेटचे शेअर्स (Shares of SpiceJet) बुधवारी इंट्राडे ट्रेडमध्ये सुमारे १२ टक्क्यांनी घसरले. डीजीसीएने अलिकडच्या काही महिन्यांतील अनेक आर्थिक अडचणींदरम्यान स्पाईसजेटला देखरेखीखाली ठेवल्याचे वृत्त पीटीआय वृत्तसंस्थेने दिले आहे. दरम्यान, स्पाइसजेटने या वृत्ताचे खंडन केले.
हे ही वाचा :