Arshdeep Singh : अश्रदीपच्या नावावर नोंदला गेला ‘हा’ लाजीरवाना विक्रम

Arshdeep Singh : अश्रदीपच्या नावावर नोंदला गेला ‘हा’ लाजीरवाना विक्रम

पुणे; पुढारी ऑनलाईन : भारतीय क्रिकेट संघाचा 23 वर्षीय वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगच्या नावे गुरुवार, 5 जानेवारी रोजी श्रीलंकेविरुद्धच्या तीन T20I मालिकेतील दुसऱ्या सामन्यात एक लाजिरवाणा विक्रम नोंदवला गेला आहे. किंबहुना, एकाच T20I मालिकेत सर्वाधिक नो-बॉल टाकणारा तो गोलंदाज ठरला आहे. पहिल्या सामन्यात अर्शदीपला सामना खेळण्याची संधी मिळू शकली नाही. दुसऱ्या सामन्यात त्याला संधी मिळाली पण यावेळी त्याने आपली लय मिळवता आली नाही. (Arshdeep Singh)

सलग ३ नो-बॉल टाकले (Arshdeep Singh)

अर्शदीप सामन्यातील दुसरे षटक टाकण्यासाठी आला तेव्हा पहिले ५ चेंडू त्याने नीट टाकले. पण शेवटचा चेंडू पूर्ण करण्यापूर्वी त्याने सलग तीन नो-बॉल टाकले. या तीन नो बॉलसह तो T20I मध्ये सलग तीन नो-बॉल टाकणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला. अर्शदीपला दुसऱ्या नो-बॉलवर चौकार आणि तिसऱ्या नो-बॉलवर प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाने षटकार ठोकले. या षटकात अर्शदीपने १९ धावा दिल्या, त्यामुळे श्रीलंकेच्या संघाला वेगवान सुरुवात करण्याची संधी मिळाली.

दुसऱ्या षटकात टाकले २ नो-बॉल

सामन्यातील आपल्या पहिल्या षटकात अर्शदीपने सलग ती नो-बॉलसह १९ धावा दिल्याने कर्णधार हार्दीक पांड्याने त्याच्याकडे पाठफिरवली. पुढे हार्दीकने त्याला १९ वे षटक टाकण्यास दिले. पण, तरीही अर्शदीपला आपली लय पकडता आली नाही. या षटकामध्ये त्याने पुन्हा दोन नो-बॉल टाकले व या षटकात त्याने १८ धावा दिल्या. या षटकात त्याला एक चौकार व एक षटकार श्रीलंकेच्या फलंदाजांन ठोकला. (Arshdeep Singh)

कारकीर्दीत टाकले सर्वाधिक नो-बॉल

नो-बॉलची हॅट्ट्रिक आणि पुढील षटकात पुन्हा २ नो-बॉल टाकून अर्शदीपने त्याच्या T20I कारकिर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यात १५ नो-बॉल टाकण्याची नामुष्की ओढावली आहे. अर्शदीप सिंग आजारपणामुळे नवीन वर्षातील पहिला टी-20 सामना खेळू शकला नाही. हा डावखुरा वेगवान गोलंदाज आजारातून बरा झाला आणि दुसऱ्या T20I मध्ये जागा घेतली. भारताने शिवम मावी आणि उमरान मलिक यांना दुसऱ्या सामन्यात कायम ठेवले तर हर्षल पटेलच्या जागी अर्शदीपला संधी मिळाली. पण, आजारपणातून बाहेर येण्याचा तणाव त्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता व याचाच परिणाम त्याच्या गोलंदाजीवर झाला.

टी-२० मध्ये सर्वाधिक नो-बॉल टाकलेले गोलंदाज

  • १५ – अर्शदीप सिंग
  • ११ – हसन अली
  • ११ – कीमा पॉल
  • ११ – ओशाने थॉमस
  • १० – रिचर्ड नागरवा

अधिक वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news