Rishabh Pant : ऋषभ पंत याच्या फंलदाजीवर ‘या’ दिग्गज खेळाडूने उपस्थित केले प्रश्नचिन्ह

Rishabh Pant : ऋषभ पंत याच्या फंलदाजीवर ‘या’ दिग्गज खेळाडूने उपस्थित केले प्रश्नचिन्ह
Published on
Updated on

मुंबई; पुढारी ऑनलाईन : दक्षिण आफ्रिके विरुद्ध टी २० मालिकेतील (IND Vs SA T20 2022) हंगामी कर्णधार ऋषभ पंत (Rishabh Pant) आधीच आपल्या खराब फलंदाजीमुळे चाहत्यांच्या आणि क्रिकेट समिक्षकांच्या निशाण्यावर आला आहे. त्यात आता भारताचे माजी कर्णधाराने ऋषभ पंतच्या खेळीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी ऋषभ पंतच्या विचित्र पद्धतीने सातत्याने बाद होण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. तो सातत्याने त्याच त्याच चुका करत आहे. शिवाय त्याला यंदाच्या आयपीएलमध्ये देखील फारसा प्रभाव टाकता आला नाही. सध्या चालू असणाऱ्या दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या मालिकेत देखिल तो अपयशी ठरला आहे.

आफ्रिके विरुद्धच्‍या टी २० मालिकेतील चार सामन्यात ऋषभ पंतला (Rishabh Pant) चांगली कामगिरी करता आलेली नाही. तो सातत्याने ऑफ साईडला पडणाऱ्या चेंडूवर खराब फटके मारुन बाद होत आहे. सध्या त्याच्यावर सर्वस्तरातून टीका होत आहे. यावर भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी ऋषभ पंतच्या फलंदाजीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

ऑफ साईडला चेंडू टाका आणि पंतची विकेट मिळवा

ऋषभ पंत (Rishabh Pant) खेळत असलेल्या फटकेबाजीवर प्रश्नचिन्ह उपस्थित एका क्रीडा वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये सुनील गावस्कर म्हणाले, ऑफ स्टम्पवर जाणाऱ्या चेंडूवर सातत्याने बाद होणे हे ऋषभ पंतसाठी चांगले संकेत नाहीत. आतापर्यंत ऑफस्टम्पच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूवर मोठे फटके खेळायच्या प्रयत्नात तो बाद झ्राला आहे. मागील तीन सामन्यात सातत्याने त्याच ठिकाणी बाद होऊन देखील यातून ऋषभकाहीही शिकले नाही. दक्षिण आफ्रिकेचे गोलंदाज त्याला ऑफ स्टम्पच्या बाहेर चेंडू टाकत आहेत आणि त्यांच्या जाळ्यात पंत अडकत चालला आहे. बाहेरील चेंडूवर मोठे फटके मारण्यापासून ऋषभ पंतने स्वत:ला रोखले पाहिजे. पंत विरुद्ध आफ्रिकेने खास रणनिती ठरवली आहे. ऑफ साईडला चेंडू टाका आणि पंतची विकेट मिळवा, ही त्यांची योजना सध्या यशस्वी होताना दिसत असल्याचे गावस्कर यावेळी म्हणाले.

यावेळी गावस्कर यांनी पंतच्या फलंदाजीवर बोलताना म्हणाले, यावर्षी टी २० सामन्यात किमान दहा वेळा तरी ऋषभ अशाच पद्धतीने बाद झाला आहे. जर त्याने काही चेंडूना सोडले असते तर तो चेंडू वाईड सुद्धा झाला असता. ऑफ साईडच्या बाहेरील चेंडूला फटकाविण्यासाठी अधिक ताकतीची सुद्धा आवश्यकता असते. भारताचा हंगामी कर्णधार सातत्याने एकाच पद्धतीने बाद होणे हे योग्य नाही. आफ्रिके विरुद्धच्या चारही सामन्यात आफ्रिकेच्या स्पिनर्संना पंत विरुद्ध गोलंदाजी करताना फारसं डोकं वापरावे लागले नाही. साधं सरळ गणित होतं की, चेंडूला ऑफ स्टम्पच्या बाहेर टाकणे. अशा चेंडूवर ऋषभ स्वत: आपली विकेट गोलंदजाला बहाल करुन जात होता.

ऋषभ पंत याच्याकडे आता आपल्या टीकाकारांना उत्तर देण्यासाठी फक्त एकच सामना शिल्लक राहिला आहे. तसेच भारतीय संघात वाढत्या यष्टीरक्षक फलंदाजांच्यामुळे त्याच्यावर दबाव वाढत झालला आहे. सध्या त्याच्या समोर इशान किशन (Ishan Kishan) आणि दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) यांचे आव्हान उभे आहे. या दोघांनी देखील या मालिकेत उल्लेखनिय कामगिरी बजावली आहे.

दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या टी २० मालिकेत ऋषभ पंत याने मागील चार सामन्यात २९, ५, ६ आणि १७ अशा धावा केल्या आहेत. त्याने त्याच्या टी २० करिअर मध्ये ४७ सामन्यात ७४० धावा केल्या आहेत. याच मालिकेत पहिले दोन सामने पराभूत झाल्यामुळे त्याच्या नेतृत्त्वावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. यामुळे त्याला लवकरात लवकर आपल्या फॉर्ममध्ये येणे गरजेचे आहे अन्यथा त्याला संघातून वगळले जाऊ शकते, असेही गावस्‍कर यांनी स्‍पष्‍ट केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news