IND vs IRE : भारत-आयर्लंड यांच्यात ऑगस्टमध्ये टी-20 मालिका

IND vs IRE : भारत-आयर्लंड यांच्यात ऑगस्टमध्ये टी-20 मालिका

Published on

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : भारतीय संघ ऑगस्टमध्ये 3 टी-20 सामन्यांसाठी आयर्लंड दौरा करणार आहे. विंडीजविरुद्ध सर्व क्रिकेट प्रकारांतील मालिका संपन्न झाल्यानंतर लगोलग ही स्पर्धा होणार आहे. उभय संघांतील ही छोटेखानी मालिका दि. 18 ऑगस्ट ते 23 ऑगस्ट या कालावधीत होणे अपेक्षित आहे. (IND vs IRE)

क्रिकेट आयर्लंडचे सीईओ वॉरेन ड्यूट्रम यांनी हा दौरा निश्चित केल्याबद्दल आभार मानले. भारतीय संघ वर्षभरातच दुसर्‍यांदा आयर्लंड दौर्‍यावर येत असल्याचा आनंद आहे, असे ते म्हणाले. यापूर्वी 2022 मध्ये दोन्ही सामन्यांना अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता. आताही या मालिकेला तसाच प्रतिसाद अपेक्षित आहे, याचा त्यांनी येथे उल्लेख केला. (IND vs IRE)

भारताने यापूर्वी मागील आयर्लंड दौर्‍यात 2 टी-20 सामने खेळले आणि त्या दोन्ही सामन्यांत एकतर्फी विजय नोंदवले होते. यंदा ऑगस्टमध्ये भारतीय संघ पुन्हा आयर्लंडमध्ये खेळणार असल्या ने तेथील स्थानिक क्रिकेटप्रेमींसाठी ही आणखी एक पर्वणी असणार आहे. आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही संघातील 3 टी20 सामने अनुक्रमे 18, 20 व 23 ऑगस्ट रोजी खेळवले जाणार आहेत.

हेही वाचा;

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news