IND vs PAK 2023 : ...तर ईडनवर भारत-पाक सेमीफायनल स्वप्नपूर्ती ठरेल! | पुढारी

IND vs PAK 2023 : ...तर ईडनवर भारत-पाक सेमीफायनल स्वप्नपूर्ती ठरेल!

कोलकाता : आयसीसी क्रिकेट वन-डे विश्वचषक स्पर्धेतील सामन्यांकरिता बंगाल क्रिकेट संघटनेने यापूर्वीच तयारीला सुरुवात केली असून, येथे ईडन गार्डन्सवर भारत-पाकिस्तानचे संघ उपांत्य फेरीत आमने-सामने आले तर ती आपल्यासाठी स्वप्नपूर्ती ठरेल, असे प्रतिपादन बंगाल क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष स्नेहाशिष गांगुली यांनी केले. आगामी वन-डे विश्वचषक स्पर्धेची रूपरेषा मंगळवारी जाहीर करण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर स्नेहाशिष बोलत होते. (IND vs PAK 2023)

भारत व पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी संघ यंदा ऑक्टोबरमध्ये अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर साखळी फेरीत आमने-सामने भिडतील. त्यानंतर उपांत्य फेरीत दोन्ही संघ आमने-सामने येत असतील तर ही लढत कोलकात्यात होऊ शकते. (IND vs PAK 2023)

स्नेहाशिष याबाबत बोलताना पुढे म्हणाले, ‘आम्ही आयपीएल स्पर्धा झाल्यानंतर लगोलग विश्वचषक स्पर्धेसाठी तयारी सुरू केली आहे. कॉर्पोरेट बॉक्सेससह बरेच नूतनीकरण केले जात असून, मैदानाची स्थिती अतिशय उत्तम आहे. मैदानाचे उर्वरित कामकाज दि. 1 जुलैपासून केले जाईल. क्युरेटरसह यापूर्वीच बैठक झाली असून, ईडन गार्डन्स विश्वचषक स्पर्धेसाठी सुसज्ज आहे, हे आम्ही स्पष्ट करू इच्छितो. पुढील दोन महिन्यांच्या आत येथील सर्व औपचारिक बाबी पूर्ण होतील. आम्ही उपांत्य फेरीची लढत मिळावी, यासाठी प्रयत्नशील होतो आणि अगदी शेवटच्या क्षणी या प्रयत्नांना यश मिळाले. तिकिटांच्या किमतीवर येत्या काही दिवसांत निर्णय होणे अपेक्षित आहे.

हेही वाचा;

Back to top button