‘फोन पे’द्वारे थेट आयकर रिटर्न्स भरा

‘फोन पे’द्वारे थेट आयकर रिटर्न्स भरा

नवी दिल्ली; वृत्तसंस्था :  'फोन पे'द्वारे थेट प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची सुविधा करदात्यांना उपलब्ध करून दिली आहे. यासाठी 'बी 2 बी' या आघाडीच्या पेमेंट अँड सर्व्हिस प्रोव्हायडर डिजिटल कंपनीसोबत 'फोन पे' कंपनीने भागीदारी केली आहे.

'फोन पे'वरील अ‍ॅपमध्ये टॅक्स पोर्टल ओपन केल्यास इन्कम टॅक्स पेमेंट फीचरवर ही सुविधा उपलब्ध असेल सर्व प्रकारच्या करदात्यांना या अ‍ॅपवरून स्वमूल्यांकित आणि आगाऊ कर भरण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. करदात्यांना क्रेडिट कार्ड आणि यूपीआयचा वापर करता येईल.

क्रेडिट कार्डधारकांना 45 दिवसांचा इंटरेस्ट फ्री कालावधी मिळेल. शिवाय, रिवॉर्डस् म्हणून बँकांच्या वतीने काही पाँईटस्ही मिळतील. रिवॉर्डस्बाबत बँका निर्णय घेतील. 'फोन पे'द्वारे पेमेंट झाल्यास 24 तासांत युनिक ट्रान्झॅक्शन रेफरन्स (यूटीआर) मिळेल.

  हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news