राज्यात अतिवृष्टी, पुरामुळे ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; यवतमाळ, बुलढाणा जिल्ह्यांचे सर्वाधिक नुकसान | Crop losses due to flood

राज्यात अतिवृष्टी, पुरामुळे ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; यवतमाळ, बुलढाणा जिल्ह्यांचे सर्वाधिक नुकसान | Crop losses  due to flood

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्यात सध्या होत असलेल्या अतिवृष्टी, पूर व पावसामुळे सुमारे 4 लाख 19 हजार हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे. त्यामध्ये 10 जिल्ह्यात झालेल्या नुकसानीमध्ये सर्वाधिक फटका यवतमाळ आणि बुलढाणा जिल्ह्यातील शेतीला बसला असल्याची माहिती कृषी विभागाच्या ताज्या अहवालात देण्यात आलेली आहे.

नुकसान झालेले जिल्हे, क्षेत्र व पिकांची नावे पुढीलप्रमाणे : रायगड जिल्ह्यातील सुधागड, पाली, कर्जत तालुक्यातील 45 हेक्टरवरील भात व नाचणी, रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर, चिपळूण, दापोली, खेड व मंडणगड या तालुक्यातील 17 हेक्टरवरील आंबा, फणस, नारळ, भात, सुपारी आणि भाजीपाला या पिकांना फटका बसला आहे. दरम्यान, जळगावमध्ये 149 हेक्टरवरील कापूस, केळी, मका, उडीद, मूग तसेच नागपूर जिल्ह्यातील 199 हेक्‍टरवरील कापूस सोयाबीन संत्रा मोसंबी भाजीपाला पिकाचे नुकसान झाले आहे. याशिवाय वर्धा जिल्ह्यात 1 हजार 659 हेक्टर, भंडारा 2 हजार 235 हेक्टर, गडचिरोली 402 हेक्टर, अकोला 14 हजार 700 हेक्टर, बुलढाणा 1 लाख 54 हजार 413 हेक्टर, चंद्रपूर 5, हजार 758 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालेले आहे. सर्वाधिक फटका यवतमाळ जिल्ह्याला बसला असून तेथील २ लाख 41 हजार 603 हेक्टरवरील पिकांना अतिवृष्टीचा मोठा तडाखा बसलेला आहे. त्यामध्ये सोयाबीन, तूर, उडीद, ज्वारी ,भाजीपाला, हळद आणि कापसाचा समावेश असल्याचे कृषी आयुक्तालयातून सांगण्यात आले. पावसाचे प्रमाण असेच कायम राहिल्यास नुकसानीखालील पिकांचे क्षेत्र आणखी वाढण्याचा अंदाज कृषी अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news