नागपुरात आयकर विभागाकडून ७ व्यक्तींशी संबंधित १० ठिकाणांवर छापे

आयकर विभाग
आयकर विभाग
Published on
Updated on

नागपूर : पुढारी वृत्‍तसेवा आयकर विभागाने शहरात आज (बुधवार) सकाळपासून ७ व्यक्तींशी संबंधित १० ठिकाणांवर छापे मारले आहेत. या कारवाईने व्यवसायिकांमध्ये खळबळ माजली आहे. हवाला आणि बांधकाम व्यवसायाशी संबंधित असलेल्या व्यक्तींवर हे छापे घालण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

आयकर विभागाचे छापे पडलेल्या व्यावसायिकांमध्ये रवी अग्रवाल, लाला जैन, शैलेश लखोटिया, इज़राइल सेठ, तन्ना अशी नावे सांगण्यात येत असून, आयकर विभागाकडून कुठली कागदपत्रे ताब्यात घेतली या विषयी कुठलाही दुजोरा मिळालेला नाही.

या कारवाईसाठी पहाटेच आयकर विभागाचे पथक नागपुरात दाखल झाले होते. सकाळी सात वाजल्यापासून ही कारवाई सुरु झाली. सदर कंपन्यांमध्ये करविषयक आर्थिक अनियमितता व इतर कारणांपायी हे छापे पडल्याची माहिती आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news