US Shooting : अमेरिका सलग दुसऱ्या दिवशी गोळीबाराने हादरली; १८ ठार; १३ जण जखमी

US Shooting
US Shooting

पुढारी ऑनलाईन : अमेरिकेत पुन्हा एकदा गोळीबाराची घटना समोर आली आहे. लुईस्टन येथे झालेल्या गोळीबारात 18 जण ठार तर 13 जण जखमी झाले आहेत. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. पोलिसांनी सांगितले की, अधिकारी मृतांची ओळख पटवण्याचे काम करत आहेत.

अमेरिकेतील गोळीबाराच्या घटना काही थांबायचे नाव घेत नाहीत अशी स्‍थिती दिसून येत आहे. लुईस्टन येथे गोळीबाराची घटना घडून २४ तासही उलटले नाहीत, तर मेनमधील लुईस्टन येथे गोळीबाराची आणखी एक घटना घडली, ज्यात १८ जणांचा मृत्यू झाला असून १३ जण जखमी झाले आहेत. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, एक संशयित सध्या फरार आहे. मेन पब्लिक सेफ्टी कमिशनर माईक सॉस्चक यांनी गुरुवारी सांगितले की, अधिकारी 40 वर्षीय रॉबर्ट कार्डला शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. दोन यूएस अधिकारी आणि एका माजी उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले की, संदिग्ध व्यक्ती विशिष्ट व्यक्तीला लक्ष्य करत होती का याचा तपास तपास करत आहेत." ते म्हणाले की, अधिकारी पीडितांची ओळख पटवण्याचे काम करत आहेत.

पोलिसांनी सांगितले की, लेविस्टन येथील बारमध्ये गोळीबारात सहा पुरुष आणि एका महिलेचा मृत्यू झाला असे सांगितले. सुमारे चार मैल अंतरावर असलेल्या स्कीमेंझीसच्या बार आणि ग्रिलमध्ये, आस्थापनात सात पुरुष आणि बाहेरील एका व्यक्तीला गोळ्या घालून ठार करण्यात आले, असे अधिकाऱ्याने सांगितले. अन्य तीन जणांचा रुग्णालयात मृत्यू झाला.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news