पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मेट्रोचे उद्घाटन, असा असेल पुणे मेट्रोचा दुसरा टप्पा?

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मेट्रोचे उद्घाटन, असा असेल पुणे मेट्रोचा दुसरा टप्पा?
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : पुणे; पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रोच्या दुसर्‍या टप्प्याचे आज उद्घाटन करण्यात आले आहे. उद्घाटन झाल्यानंतर लगेचच 2 तासांत दुसर्‍या टप्प्यातील सेवा प्रवाशांकरिता सुरू करण्यात येणार आहे. मेट्रोची पहिल्या टप्प्यातील पीसीएमसी ते फुगेवाडी आणि वनाज ते गरवारे कॉलेज या मार्गिकेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच हस्ते झाले होते.

त्यानंतर आज दुसर्‍या टप्प्याचे उद्घाटनसुध्दा मोदी यांच्याच हस्ते करण्यात आले आहे. ही सेवा सुरू झाल्यावर दर 10 ते 15 मिनिटांनी या दोन्ही मार्गिकांवरील मुख्य स्थानकांवरून गाड्या सुटणार असून, तिकीट दर 30 ते 35 रुपयांच्या घरात असणार आहे. पुणे मेट्रोचा दुसरा टप्पा आजपासून पुणेकरांच्या सेवेत रुजू झाला आहे. पहिला टप्पा गरवारे कॉलेज ते वनाज यादरम्यान असून दुसऱ्या टप्प्यामधील दोन मार्गिका आजपासून पुणेकरांना सेवा देताना पाहायला मिळणार आहेत.

अशी आहे तिकिटात सवलत

पीसीएमसी ते वनाज, असा प्रवास करण्यासाठी 40 मिनिटे लागणार आहेत आणि त्यासाठी 35 रुपये भाडे लागेल. तसेच पीसीएमसी ते रुबी हॉल यासाठी 30 रुपये भाडे असेल. वनाज ते रुबी हॉल यासाठी 35 रुपये भाडे असेल. विद्यार्थ्यांसाठी भाड्यामध्ये 30 टक्के सवलत असणार आहे. शनिवारी, रविवारी सर्व नागरिकांसाठी 30 टक्के सवलत असणार आहे. तसेच, मेट्रो कार्डधारकांसाठी सरसकट 10 टक्के सवलत असणार आहे.

असा असेल पुणे मेट्रोचा दुसरा टप्पा?

आजपासून पुणेकरांच्या सेवेत रुजू होणाऱ्या मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यात दोन मार्गिकांचा समावेश असून यामध्ये पहिली मार्गिका गरवारे महाविद्यालय ते रुबी हॉलपर्यंत तर, दुसरी मार्गिका ही फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट अशी असेल. या दोन्ही मार्गिकांवरील मेट्रोने आजपासून नागरिकांना प्रवास करता येणार आहे. एकूण १३ किलोमीटर अशा लांबीच्या या दोन्ही मार्गिका आहेत.

अशी आहे मेट्रोची सेवा

  • पहिला टप्पा : (उद्घाटन : 6 मार्च 2023)
  • वनाज ते गरवारे कॉलेज : 5 किलोमीटर
  • स्थानके : वनाज, आनंदनगर, आयडियल कॉलनी, नळस्टॉप, गरवारे कॉलेज
  • पीसीएमसी ते फुगेवाडी : 7 किलोमीटर
  • स्थानके : पीसीएमसी, संत तुकारामनगर, भोसरी (नाशिक फाटा), कासारवाडी, फुगेवाडी
  •  दुसरा टप्पा : (उद्घाटन : 1 ऑगस्ट 2023)
  • गरवारे कॉलेज ते रुबी हॉल स्टेशन : 4.7 किलोमीटर
  • स्थानके : डेक्कन जिमखाना, छत्रपती संभाजी महाराज उद्यान, पीएमसी, सिव्हिल कोर्ट, मंगळवार पेठ (आरटीओ), रुबी हॉल क्लिनिक स्टेशन
  • फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट : 6.9 किलोमीटर
  • स्थानके : फुगेवाडी, दापोडी, बोपोडी, खडकी, रेंजहिल, शिवाजीनगर, सिव्हिल कोर्ट

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news