Sachin Tendulkar : कमाईच्या बाबतीत सचिन आजही धोनी-विराटपेक्षाही पुढे

Sachin Tendulkar : कमाईच्या बाबतीत सचिन आजही धोनी-विराटपेक्षाही पुढे
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : क्रिकेटचा देव असा दर्जा मिळालेला भारतीय क्रिकेटर सचिन तेंडुलकरचा आज (24 एप्रिल) 50 वा वाढदिवस आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडणाऱ्या या महान फलंदाजाने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक विक्रम केले. सचिनला क्रिकेटमधून निवृत्त होऊन 10 वर्षे उलटली असली तरी लोक आजही त्याच्यावर भरभरून प्रेम करतात. (Sachin Tendulkar)

जाणून घ्या सचिन तेंडुलकरची एकूण संपत्ती?

सचिन तेंडुलकरने वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी टीम इंडियासाठी पदार्पण केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३०,००० धावांचा टप्पा गाठणारा तो जगातील पहिला आणि एकमेव फलंदाज आहे. भारतीय संघाकडून खेळताना त्याने अनेक विक्रम केले आणि जगात वेगळी छाप सोडली. (Sachin Tendulkar)

तेंडुलकरची एकूण संपत्ती सुमारे १७५ दशलक्ष डॉलर्स म्हणजेच १४३६ कोटी रुपये आहे. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर सचिन जाहिरातींमधून बक्कळ कमाई करत आहे. याशिवाय अनेक बड्या कंपन्या सचिनच्या चेहऱ्यावर विश्वास व्यक्त करत त्याला आपल्या जाहिरातींमध्ये घेण्यास प्राधान्य देतात.

Boost, Unacademy, Castrol India, BMW, Luminous India, Sunfeast, MRF टायर्स, Aviva Insurance, Adidas, Spinny या कंपन्यांची जाहिरात करताना सचिन आपल्याला दिसतो. जिओ सिनेमानेही सचिन तेंडुलकरला ब्रँड अॅम्बेसेडर बनवले आहे.

सचिन तेंडुलकरला वाहनांची खूप आवड

सचिन तेंडुलकरला चारचाकी गाड्यांची खूप आवड आहे. तो २० कोटींच्या कारमध्ये फिरतो. रिपोर्ट्सनुसार, सचिनकडे Ferrari 360 Moden, BMW i8, BMW 7 Series, 750Li M Sport, Nissan Gt-R, Audi Q7, BMW M6 Gran Coupe यांचा समावेश आहे.

हेही वाचा;

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news