नाशिकमध्ये भाजपला खिंडार ; विद्यमान उपमहापौर, माजी उपमहापौरांसह काही नगरसेवक शिवसेनेत

नाशिकमध्ये भाजपला खिंडार ; विद्यमान उपमहापौर, माजी उपमहापौरांसह काही नगरसेवक शिवसेनेत

नाशिक पुढारी वृत्तसेवा :  नाशिक महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षाला मोठे खिंडार पडले आहे. विद्यमान उपमहापौरांसह माजी उपमहापौर व काही नगरसेवक आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, भाजपच्या विद्यमान उपमहापौर भिकूबाई बागुल यांच्यासह माजी उपमहापौर प्रथमेश गीते यांनी भाजपला सोडचिट्ठी देत आज शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई येथे शिवसेना भवनात काही वेळात हा प्रवेश सोहळा पार पडणार आहे.

यासोबतच  दिनकर कांडेकर, नगरसेविका हेमलता कांडेकर या देखील आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.  हेमलता कांडेकर यांनी महापालिका आयुक्त कैलास जाधव यांच्याकडे नगरसेविका पदाचा राजीनामा देखील सुपूर्द केला आहे. तसेच अपक्ष नगरसेवक मुशीर सय्यद आणि भाजुमोचे शहराध्यक्ष मनीष बागुल देखील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news