लासलगाव बाजार समितीत थोरे गटाला ९ तर होळकर गटाला ८ जागा

लासलगाव बाजार समितीत थोरे गटाला ९ तर होळकर गटाला ८ जागा

लासलगाव (जि. नाशिक) वार्ताहर 

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत शेतकरी पॅनलचे नेते पंढरीनाथ थोरे यांच्या गटाने ९ जागा तर माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली जयदत्त होळकर गटाला ८ जागा मिळाल्या. तर व्यापारी गटातून अपक्ष उमेदवार प्रवीण कदम यांनी बाजी मारली. मतदारांनी कुणालाही स्पष्ट कौल न दिल्याने दोन्ही पॅनलच्या उमेदवारांना संभ्रमात टाकले आहे. त्यामुळे येणाऱ्या पाच वर्षात सदस्यांना काम करताना मोठी कसरत करावी लागणार आहे. या निवडणुकीत नवख्या असलेल्या उमेदवार सोनिया होळकर यांना सर्वाधिक 454 असे मते मिळवून निवडणूक आल्या.

व्यापारी गटातून उमेदवार प्रवीण शिवाजी कदम हे २३३ मते घेऊन विजयी झाले तर ज्ञानेश्वर गांगुर्डे यांना १७७ मध्ये तसेच बाळासाहेब दराडे यांनाही १७७ मते मिळाले. दोन्ही उमेदवारांना समसमान मते पडल्याने निवडणूक निर्णय अधिकारी शरद घोरपडे यांनी चिट्ठी टाकून पवन सोनकार या १२ वर्षे मुलाच्या हातून चिठ्ठी काढत बाळासाहेब दराडे यांची चिठ्ठी निघाल्याने त्यांना विजय घोषित करण्यात आले.

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती पंचवार्षिक निवडणूकित हमाल मापारी गटातून रमेश पालवे यांना २०९, ग्रामपंचायत – सर्वसाधारण जगताप डिके ३०३, थोरे पंढरीनाथ -३२२, आर्थिक दुर्बल गटात राजेंद्र बोरगुडे – २५०, अनुसूचित जाती,  महेश पठाडे -२२४,  व्यापारी गटातून -प्रवीण कदम यांना २३३, बाळासाहेब दराडे -१७७, भटक्या जाती जमाती आंधळे तानाजी यांना ४९०,
इतर मागास प्रवर्ग आवारे श्रीकांत ४२९, महिला राखीव सोनिया होळकर यांना ४५४, सुवर्णा जगताप ४१२,  सोसायटी जनरल मतदारसंघातली जयदत्त होळकर -४३४,  बाळासाहेब क्षिरसागर -४५७, संदीप दरेकर -३९०, भीमराज काळे -४३५, छबुराव जाधव -३८०, राजेंद्र डोखळे – ३४८, गणेश डोमाडे -४१५ मते मिळाली.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news