Nagar News : अपघातात कुटुंब संपले ; लहान मुलगी तेवढी बचावली
नेवासा : पुढारी वृत्तसेवा : अहमदनगर – छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील नेवासा फाटाजवळ ओढ्यात गाडी उलटून झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री ११ च्या सुमारास घडली. या अपघातात एक चिमुकली बचावली. मयतांमध्ये आणखी एका चिमुकली सह तीन महिला व चालकाचा समावेश आहे. अपघातात मृत पावलेले सर्व व्यक्ती एकाच कुटुंबातील असून ते छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी आहेत. अपघाताची माहिती मिळताच नेवासा पोलिसांसह नेवासा फाटा परिसरातील नागरिकांनी बचाव कार्यासाठी मदत केली.
हायवेवर पडलेल्या टायरला धडकून चारचाकी गाडी त्रिमूर्ती शाळेच्या ओढ्यात पलटी झाली. या अपघातात वसीम हारूण मुल्ला (वय ४१) , अनसुरा बेगम हारूण मुल्ला (वय ४१), रेश्मा हलदार (वय ३५) ,हसीना बेगम हारूण पठाण (वय ५४), सामीया मोमीन हलदार (वय १४) सर्व रा. संभाजीनगर तसेच मासुमा हलदार मोमीन हलदार (वय १३) ही मुलगी या अपघातातून बचावली आहे. संभाजीनगरचे हारूण अमीर मुल्ला यांनी नेवासा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी भादंवि कलम ३०४ अ, २७९,४२७, १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा :