Imran Khan Arrest : इम्रान खान कडेकोट बंदोबस्तात इस्लामाबाद हायकोर्टात दाखल

Imran Khan Arrest : इम्रान खान कडेकोट बंदोबस्तात इस्लामाबाद हायकोर्टात दाखल
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने गुरूवारी त्यांचा तुरुंगवास अवैध ठरवला. दरम्यान, इम्रान खान (Imran Khan Arrest) आज (दि. १२) जामिनाच्या सुनावणीसाठी इस्लामाबाद उच्च न्यायालयात दाखल झाले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, अशा प्रकारे कोणालाही अटक केली जाऊ शकत नाही. त्यामुळे त्यांना सोडण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांनी त्यांना संरक्षण द्यावे. तसेच शुक्रवारी सकाळी ११ वाजता इस्लामाबाद उच्च न्यायालयासमोर हजर करण्याचे निर्देश दिले. दरम्यान, इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पक्षाने समर्थकांना इस्लामाबाद हायकोर्टाजवळ एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. यावेळी इम्रान खान (Imran Khan Arrest)  त्यांना संबोधित करण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मंगळवारी इम्रान खान यांच्या अटकेमुळे संपूर्ण पाकिस्तानमध्ये हिंसक निदर्शने झाली. निदर्शकांनी राष्ट्रीय रेडिओ ब्रॉडकास्टची इमारत जाळून टाकली. लष्करी कमांडरच्या निवासस्थानात घुसून लाहोर, रावळपिंडी, इस्लामाबाद आणि क्वेटा सारख्या अनेक शहरांमध्ये हिंसक निदर्शने केली. यामध्ये जवळपास १२ जणांचा मृत्यू झाला. तर शेकडो जण जखमी झाले आहेत. हिंसक निदर्शने केल्याप्रकरणी हजारो लोकांना अटक करण्यात आली आहे.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना न्यायालयाबाहेरच अटक करण्यात आल्यानंतर पाकिस्तानात आगडोंब उसळला असून, कराचीपासून पेशावरपर्यंत इम्रान यांचे समर्थक रस्त्यावर उतरले आहे. रावळपिंडीत 'पीटीआय' कार्यकर्त्यांनी लष्कराच्या मुख्यालयावर हल्ल्लाबोल केला. तसेच ठिकठिकाणी पोलिस आणि लष्करी वाहनांची जाळपोळ सुरू केली. संतप्त कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी जागोजागी गोळीबार केला. (Imran Khan Arrest)

इम्रान खान त्यांच्याविरुद्ध दाखल 108 पैकी 2 गुन्ह्यांत जामीन मिळावा म्हणून मंगळवारी इस्लामाबाद उच्च न्यायालयातील बायोमेट्रिक रूममध्ये असताना निमलष्करी दलातील जवानांनी या रूमच्या काचा फोडून त्यांना अटक केली. लष्कराला माझी हत्या घडवून आणायची आहे, असा आरोप खान यांनी सातत्याने लावून धरल्यानेच त्यांना अटक करण्यात आल्याचे बोलले जाते. (Imran Khan Arrest)

पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफ (पीटीआय) या इम्रान खान यांच्या पक्षाने सत्ताधारी 'पीएमएलएन' (पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज) या पक्षाने खान यांचा ठरवून छळ चालविला असल्याचा आरोप केला आहे. खान यांच्या अटकेनंतर 'पीटीआय'च्या अधिकृत अकाऊंटवरून एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला असून, अटकेनंतर खान यांना टॉर्चर केले जात असल्याचे त्यातून सांगण्यात आले आहे. अटकेनंतर 'पीटीआय' कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी निदर्शने सुरू केली आहेत. लाहोर येथे 'पीटीआय' कार्यकर्त्यांनी लष्करातील एका कमांडरच्या घराची तोडफोड केली. घरातून हाती लागेल ते सामानही लुटून नेले. पेशावर, बन्नू आदी शहरांतून पोलिस तसेच 'पीटीआय' कार्यकर्त्यांत झटापट झाल्याचे वृत्त आहे.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news