इस्लामाबाद : पुढारी ऑनलाईन; पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ ( PTI ) पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांच्या अटकेने पाकिस्तानात गृहयुद्ध पेटले आहे. इम्रान खान यांच्या अटकेच्या निषेधार्थ क्वेटा येथे काढण्यात आलेल्या रॅलीत गोळीबार झाला असून त्यात पीटीआय (pakistan tehreek-e-insaf) पक्षाच्या एक कार्यकर्त्याचा मृत्यू झाला. तर अन्य ६ जण जखमी झाले. इम्रान खान यांच्या समर्थकांनी मुख्य क्वेटा विमानतळ रस्ता रोखून धरला. पीटीआयच्या रॅलीमध्ये गोळीबाराची घटना घडल्याचे वृत्त द एक्सप्रेस ट्रिब्यूनने एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याचा हवाल्याने दिले आहे. (Imran Khan arrest updates)
इम्रान खान यांना मंगळवारी इस्लामाबाद उच्च न्यायालयाजवळ निमलष्करी दलाच्या रेंजर्सनी अटक केली होती. त्यांच्या अटकेच्या निषेधार्थ पाकिस्तानातील अनेक शहरांमध्ये हिंसक निदर्शने सुरू आहेत. इम्रान खान समर्थक कमालीचे आक्रमक बनले असून, ते सर्वत्र जाळपोळ करत सुटले आहेत. अनेक ठिकाणी पोलिस आणि 'पीटीआय' कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री झाल्याचे वृत्त आहे. (imran khan pakistan news today)
इम्रान खान यांना अल-कादिर ट्रस्ट प्रकरणात अटक करण्यात आली आहे. " इस्लामाबादमध्ये कलम १४४ लागू करण्यात आले आहे आणि त्याचे उल्लंघन केल्यास पोलिस कारवाई केली जाईल," असा इशारा इस्लामाबाद पोलिसांनी दिला आहे. पोलिसांनी लोकांना त्यांच्या ठरलेल्या ठिकाणी पोहोचण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचा सल्लाही दिला आहे. (imran khan arrested)
पोलिसांनी कराची आणि लाहोरमध्ये खान यांच्या समर्थकांना रोखण्यासाठी अश्रुधूर आणि पाण्याच्या फवाऱ्याचा मारा केला. तर आंदोलकांनी इस्लामाबादसह शेजारील रावळपिंडी आणि पेशावरमध्ये रास्ता रोको केला. यामुळे वाहतूक ठप्प झाली. खान यांच्या पीटीआय पक्षाने त्यांच्या समर्थकांना पाकिस्तान बंदची हाक दिली आहे.
रावळपिंडीतील लष्करी मुख्यालयावर, पेशावरमधील फ्रंटिअर कॉर्प्सच्या मुख्यालयावर तसेच पाक गुप्तचर संघटना 'आयएसआय'च्या मुख्यालयावरही इम्रान खान समर्थकांनी हल्लाबोल केला. 'आयएसआय'च्या परिसरात जाळपोळ केली.
'पीटीआय'ने लष्कराने नागरिकांवर गोळीबार केल्याचा दावा केला आहे. फैसलाबादेत सुरक्षा यंत्रणांच्या गोळीबारात १३ आंदोलक जखमी झाले आहेत. (Imran Khan arrest updates)
आदोलकांनी रेडिओ पाकिस्तानच्या पेशावरमधील इमारतीला आग लावली. सरकारने संपूर्ण देशात संचारबंदी (कलम १४४) लागू केली आहे. इस्लामाबाद, कराची, लाहोरसह प्रमुख शहरांत इंटरनेट बंद करण्यात आले आहे.
आंदोलकांनी लष्कराच्या कोअर कमांडरच्या घरातही नासधूस तसेच लुटालूट केली. लष्कराच्या मुख्यालयाला इम्रान समर्थकांनी घेराव घातला आणि खान यांची सुटका होत नाही, तोवर आपण या ठिकाणाहून हलणार नसल्याचा पवित्रा घेतला. ठिकठिकाणी पोलिसांची वाहनेही समर्थकांनी जाळली.
पाकिस्तानी हवाई दलाच्या मियाँवाली हवाईतळावरही इम्रान समर्थक चालून गेले. येथेही जाळपोळ केली. प्रचंड गोंधळ येथे झाला. येथून जवळच 'इसिस'चे कार्यालय आहे.
हे ही वाचा :