Ileana D’Cruz : इलियानाने २ महिन्यानंतर पुन्हा दाखविली क्यूट बाळाची झलक

Ileana D'Cruz
Ileana D'Cruz

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूज ( Ileana D'Cruz ) आणि पार्टनर मायकल डोलनने गेल्या १ ऑगस्ट २०२३ रोजी गोंडस बाळाला जन्माचे स्वागत केलं. यानंतर कपलने त्याच्या बाळाचे नाव कोआ फिनिक्स डोलन असे ठेवण्यात आलं. प्रेग्नसीपासून ते डिलीव्हरीपर्यत प्रत्येक अपडेटस चाहत्यांना सोशल मीडियावर शेअर करत असते. सध्या इलियानाच्या मुलाला दोन महिने पूर्ण झाल्यानंतर त्याची पुन्हा झलक पाहायला मिळत आहे.

संबधित बातम्या 

अभिनेत्री इलियाना डिक्रूजने ( Ileana D'Cruz ) तिच्या इन्स्टाग्रामवर मुलगा कोआ फीनिक्स डोलनला दोन महिने पूर्ण झाल्याने त्याच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत इलियाना मुलाला स्वत: च्या खांद्यावर घेवून कॅमेऱ्याकडे पाहायताना दिसतेय. यावेली तिने मुलाला कवेत घेवून झोपवताना दिसतेय. तर दुसरीकडे मुलाने इलियानाच्या हाताला घट्ट पकडले आहे. व्हाईट रंगाच्या कपड्यात एलियाना सुंदर तर मुलगा कोआ क्यूट दिसतोय.

या फोटोला तिने 'फक्त दोन महिन्यापूर्वी' अशी कॅप्शन लिहिली आहे. यावेळी इलियानाच्या मुलाचा चेहरा स्पष्ट दिसत आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच दोघांच्यावर चाहत्यांनी भरभरून कौतुकाचा वर्षाव केलाय.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, इलियाना शेवटची रॅपर बादशाहच्या 'सब गजब' गाण्याच्या म्युझिक व्हिडिओमध्ये दिसली होती. याआधी ती अभिषेक बच्चनसोबत 'द बिग बुल' मध्ये दिसली होती. हा चित्रपट कुकी गुलाटी यांनी दिग्दर्शित आणि अजय देवगणने निर्मिती केली होती. याशिवाय इलियाना लवकरच रणदीप हुड्डासोबत 'अनफेअर अँड लव्हली'मध्ये दिसणार आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news