‘महिलांना सेक्ससाठी विचारणे #MeToo असेल तर मी करणारच; १० महिलांसोबत संबंध ठेवले आहेत’

‘महिलांना सेक्ससाठी विचारणे #MeToo असेल तर मी करणारच; १० महिलांसोबत संबंध ठेवले आहेत’

पुढारी ऑनलाईन डेस्क : सध्या बॉलिवूडच्या चाहत्यांमध्ये साऊथ चित्रपटांची क्रेझ दिसून येत आहे. त्याचवेळी तामिळ आणि मल्याळम चित्रपट अभिनेता विनायकन याने मी टूबाबत वादग्रस्त विधान केले आहे. या विधानामुळे विनायकन सध्या खूप चर्चेत आहे. विनायकन त्याच्या 'ओरुथी' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे आणि सध्या इंटरनेटवर 'MeToo'वर चर्चेत आहे.

मला 'MeToo'बद्दल काहीही माहिती नसल्याचे विनायकन म्हणाला. महिलांना सेक्ससाठी विचारणे म्हणजे MeToo असेल, तर मी करत राहील, असे म्हटल्याने पुन्हा एकदा वादाला तोंड फुटले आहे.

रिपोर्ट्सनुसार, विनायकन म्हणाला होता की, MeToo म्हणजे काय ? मला त्याबद्दल माहिती नाही. मला जाणून घ्यायचे आहे. मला एखाद्या स्त्रीसोबत सेक्स करायचा असेल तर ? मी माझ्या आयुष्यात १० महिलांसोबत शारीरिक संबंध ठेवले आहेत. मी त्या सर्वांना विचारले की तिला माझ्याशी संबंध ठेवायला आवडेल का ? त्यांना मी अजूनही विचारेन की त्या याला MeToo म्हणतात का ?

विनायकन पहिल्यांदाच काही वादग्रस्त बोलला असे नाही, तर २०१९ मध्ये त्याला या कारणांमुळे अटकही झाली होती. दलित कार्यकर्त्या आणि माजी मॉडेल मृदुला देवी यांनी विनायकन यांना कार्यक्रमात आमंत्रित करण्यासाठी बोलावले तेव्हा अश्लील आणि अपशब्द वापरल्याचा आरोप केला होता. महिलेने त्याच्याविरुद्ध आयपीसीच्या कलम 509, 294 (बी) आणि केरळ पोलीस कायद्याच्या कलम 120 (ओ) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. विनायकनला अटक करण्यात आली आणि नंतर केरळ उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला.

हे ही वाचलं का ?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news