ICC World Cup 2023 | क्रिकेट वर्ल्डकपमधील खेळाडूंच्या मेन्यूमध्ये ‘नो बीफ’, पाक संघाने केली ‘ही’ मागणी

ICC World Cup 2023
ICC World Cup 2023
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयसीसी पुरुष एकदिवसीय विश्वचषक २०२३ स्पर्धा ५ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. पाकिस्तानचा क्रिकेट संघ बुधवारी रात्री भारतात दाखल झाला. त्याचे जंगी स्वागत करण्यात आले. एका अहवालानुसार, विश्वचषक स्पर्धेत सहभागी होणार्‍या कोणत्याही संघांच्या त्यांच्या खाद्यपदार्थाच्या मेनूमध्ये बीफचा समावेश नसेल. (ICC World Cup 2023)

ICC World Cup 2023 : आहारात बीफ नसेल

भारतात ५ ऑक्टोबरपासून आयसीसीचा पुरुष एकदिवसीय विश्वचषक २०२३ स्पर्धा होणार आहे. यंदा म्हणजे 2023 चा विश्वचषक प्रथमच पूर्णपणे भारतात होत आहे. यापूर्वी भारताने १९८७, १९९६ आणि २०१ साली विश्वचषकाचे सहआयोजकत्व केले होते. या एकदिवसीय विश्वचषक २०२३ सराव सामन्यात पाकिस्तानचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी दोन्ही संघ आधीच भारतात आले आहेत. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना होणार आहे. या दरम्यान पाकिस्तान क्रिकेट संघासाठी कोणता आहार असेल हे आता स्पष्ट झाले आहे. या आहारातून  बीफ वगळण्यात आले आहे. या आहारात  चिकन, मटण आणि मासे असतील. बटर चिकन आणि हैदराबादी बिर्याणी यांसारखे काही स्थानिक पदार्थही असणार आहेत. तथापि, त्यांना बीफ दिले जाणार नाही.

पाक संघाची खास मागणी

केवळ पाकिस्तानच नाही, तर या स्पर्धेत सहभागी होणार्‍या कोणत्याही संघांना त्यांच्या खाद्यपदार्थाच्या मेनूमध्ये गोमांस नसेल. पीटीआयच्या वृत्तानुसार, पाक संघाने त्यांचे कार्बोहायड्रेटचे प्रमाण पूर्ण करण्यासाठी त्यांच्या मेनूमध्ये स्टीम्ड बासमती तांदूळ, शेन वॉर्नचा आवडता पदार्थ बोलोग्नीज सॉसमधील स्पॅगेटी आणि शाकाहारी पुलावची मागणी केली आहे.
पाकिस्तान त्यांचा पहिला सराव सामना शुक्रवारी न्यूझीलंड आणि त्यानंतर मंगळवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे. त्यांच्या विश्वचषक मोहिमेची सुरुवात ६ ऑक्टोबर रोजी न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या सामन्याने होईल.
हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news