पुढारी ऑनलाईन डेस्क : टी- २० विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी दोन अप्रतिम सामने क्रिकेट चाहत्यांना पाहायला मिळाले. पात्रता फेरीतील पहिल्या सामन्यात श्रीलंकेचा नामिबियाविरुद्ध मोठा पराभव झाला. तर, दुसरा सामना अधिक रंगतदार झाला. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात नेदरलँड्सने यूएईचा पराभव केला. डेलिडेच्या तिखट माऱ्याने यूएईला २० षटकांत ८ गडी गमावून केवळ १११ धावांवर रोखले. नेदरलँड्सने हे आव्हान १९.५ षटकांत 7 गडी गमावत पूर्ण केले. (ICC T20 WC 2022)
नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या यूएईने २० षटकात १११ धावा केल्या. यूएईकडून मोहम्मद वसीमने सर्वाधिक ४१ धावांची खेळी खेळली. (ICC T20 WC 2022) नेदरलँड्सच्या बास डी लीने 3 बळी घेतले.
यूएईने दिलेल्या ११२ धावांचा पाठलाग करताना नेदरलँड संघाला मोठा संघर्ष करावा लागला. नेदरलँड्सने हे लक्ष्य सामन्याच्या शेवटच्या षटकात गाठत सामन्यात विजय मिळवला. नेदरलँड्सकडून फलंदाजी करताना मॅक्सोडने २३ धावा केल्या, तर शेवटी कर्णधार स्कॉट एडवर्डने १६ धावांची मौल्यवान खेळी केली. त्याने सामन्या आपल्या संघाच्या बाजूने झुकवण्यासाठी टीम पिंगलसोबत २७ धावांची भागीदारी केली.
हेही वाचा;