Devendra Fadnavis : आजही असं वाटतं की, मी मुख्यमंत्री आहे!

Devendra Fadnavis : आजही असं वाटतं की, मी मुख्यमंत्री आहे!
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते बेलापूरमध्ये महिला मासळी विक्रेत्यांना परवाना वाटप करण्यात आले. यावेळी फडणवीस म्हणाले की, "मला आजही असं वाटतं आहे की, मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे." फडणवीसांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे.

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, "आपल्या सगळ्या भगिनींना चांगल्या प्रकारचं वातावरण मिळावं. चांगल्या प्रकारच्या सोयी मिळाव्या, यासाठी अनेक योजना आपल्या काळामध्ये आपण राबवल्या आणि मला विश्वास आहे की आज भाजप आमदार मंदा म्हात्रे यांच्या कामामुळे महिलांना मोठा फायदा होईल. नवी मुंबईमध्ये गणेश नाईक असतील किंवा ताई असतील, यांच्या माध्यमातून या शहराचा विकास झाला."

"देशातलं सगळ्यात स्वच्छ शहर, वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये हे शहर नेहमी अग्रेसर राहिलं आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत जनतेचा आशीर्वाद पुन्हा मिळेल. नवी मुंबईची सेवा करण्याकरिता आमच्या नेत्यांच्या नेतृत्वामध्ये मंचावरील मंडळी कायम तयार असतील", असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

"गणेश नाईक असतील, भाजप आमदार मंदा म्हात्रे असाल, पाटील साहेब असतील यामुळे मला एकही दिवस जाणवलं नाही मी मुख्यमंत्री नाही. मला असं वाटतं मी आजही मुख्यमंत्री आहे. तुम्ही मला त्याची कमतरता जाणवू दिली नाही."असं मत देवेंद्र फडणवीस यांनी मांडलं.

"मनुष्य कुठल्या पदावर आहे हे महत्वाचं नाही तो काय करतो हे महत्वाचं आहे. गेले दोन वर्ष घरात एकही दिवस न थांबता मी जनतेच्या सेवेमध्ये आहे. त्यामुळे मला कधी जनतेने हे जाणवू दिलं नाही की आता मी मुख्यमंत्री नाही. विरोधी पक्षनेते म्हणून मी उत्तम काम करत आहे", असेही देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले.

पहा व्हिडीओ : टेस्टी साबुदाणा थालीपीठ कसा कराल?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news