पुढारी ऑनलाईन डेस्क ; बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशन (Hrithik Roshan) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) याचा आगामी 'विक्रम वेधा' (Vikram Vedha) चित्रपट लवकरच चाहत्याच्या भेटीस येत आहे. सध्या या चित्रपटाचा टिझर रिलीज झाला आहे. परंतु, टिझरमधील ऋतिक रोशनचा अभिनय काही चाहत्यांना आवडला तर काहींना चित्रपटातील डॉयलॉग कॉपी केले असल्याचे म्हटले आहे. तमिळ चित्रपटाचा हा हिंदी रिमेक आहे.
अभिनेता ऋतिक रोशनचा नुकतेच आगामी 'विक्रम वेधा' (Vikram Vedha) चित्रपटाचा टिझर रिलीज झाला. यानंतर चाहत्यानी मोठ्या उत्साहात चित्रपटाचा टिझर पाहिला गेला. याच दरम्यान सोशल मीडियावरील काही चाहत्यांनी 'विक्रम वेधा' चित्रपटाचा टिझर आवडला. परंतु, काही चाहत्यांना मात्र ऋतिकचे डॉयलॉग अजिबात आवडले नसल्याने त्याला ट्रोल करण्यास सुरूवात केली आहे.
दाक्षिणात्य अभिनेता विजय सेतुपतीची २०१७ मधील वेधाची भूमिकेला चाहत्यांनी पसंद केले हाेते. परंतु, आता याच भूमिकेत सध्या ऋतिकला पाहिल्यानंतर चाहत्यांची थोडी निराशा झाली आहे. ऋतिक रोशनचा वेदाच्या लूकमध्ये खूपच हॅडसम दिसतोय. पंरतु, चित्रपटातील त्याचे डॉयलॉग दमदार नसल्याचे चाहत्याकडून बोलले जात आहे. सुपर ३० चित्रपटाची कॉपी केली असल्याचेदेखील म्हणत ऋतिकला ट्रोल केले आहे.
'सुपर ३० पार्ट-२', 'ओव्हरॲक्टिंग शॉप…!', 'सुपर ३० चित्रपटाचे डॉयलॉग बोलले आहेत', 'कृपया कॉपी पेस्ट करणे थांबवा…!' 'विजय सेतुपतीला ब्रेक नाही…!'. यासारख्या एकापैक्षा एक कॉमेन्टस नेटकरी करत आहेत. हा चित्रपट ३० संप्टेबर २०२२ रोजी सिनेमागृहात चाहत्याच्या भेटीस येत आहे. याच दरम्यान #BoycottHrithikRoshan आणि #BoycottVikramVedha यांचा ट्रेंड जोरदार सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हेही वाचलंत का?